हातांना येईल रॉयल लूक, पाहा ६ ट्रेंडिंग सिल्व्हर ब्रेसलेट!
Lifestyle Oct 12 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
बो स्टाईल ब्रेसलेट
डिझायनर कपड्यांपासून ते डेली वेअरपर्यंत, हे 'बो' स्टाईल ब्रेसलेट प्रत्येक आऊटफिटवर छान दिसते. ऑफिस किंवा पार्टी लूकसाठी तुम्ही हे ब्रेसलेट नक्की ट्राय करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
खड्यांचे ब्रेसलेट
लहान खडे आणि नाजूक नक्षीकाम असलेली ही डिझाईन नेहमीच ट्रेंडमध्ये असते. साडी किंवा ड्रेससारख्या पारंपारिक कपड्यांवर घालण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
Image credits: Pinterest
Marathi
डबल लेयर ब्रेसलेट
तरुणी आणि कॉलेजला जाणाऱ्या मुलींना ही मॉडर्न डिझाईन खूप आवडेल! दोन बांगड्या एकत्र घातल्यासारखा लूक देणारे हे डबल लेयर ब्रेसलेट हातांना स्टायलिश बनवते.
Image credits: Pinterest
Marathi
फ्लोरल डिझाईन ब्रेसलेट
फुलांची नक्षी असलेले हे सिल्व्हर ब्रेसलेट हातांचे सौंदर्य आणखी वाढवते. ज्यांना सिम्पल आणि नाजूक डिझाईन्स आवडतात, त्यांच्यासाठी हे ब्रेसलेट परफेक्ट आहे.
Image credits: Pinterest
Marathi
मोठ्या खड्यांचे ब्रेसलेट
तुम्हाला ग्रँड आणि आकर्षक लूक हवा असेल, तर मोठ्या पांढऱ्या खड्यांचे हे ब्रेसलेट नक्की निवडा. हे ब्रेसलेट दिसायला अतिशय प्रीमियम आणि रॉयल वाटते.
Image credits: Pinterest
Marathi
कडा स्टाईल ब्रेसलेट
रुंद आकाराचे हे कडा ब्रेसलेट हातांना एक राजेशाही आणि रुबाबदार लूक देते. कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर हे ब्रेसलेट अगदी उठून दिसते.