MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • उन्हाळ्यात घरच्याघरी तयार करा हे 5 टोनर, त्वचा राहिल फ्रेश आणि हाइड्रेट

उन्हाळ्यात घरच्याघरी तयार करा हे 5 टोनर, त्वचा राहिल फ्रेश आणि हाइड्रेट

स्किन केअर रुटीनमध्ये टोनरचा समावेश करणे महत्वाचे आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सचे टोनर मिळतात. पण घरच्याघरी काही नॅच्युरल प्रोडक्ट्स वापरुन टोनर तयार करू शकता. जेणेकरुन सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा फ्रेश आणि हाइड्रेट राहण्यास मदत होईल.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 21 2025, 10:27 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
टोनरचे फायदे
Image Credit : pinterest

टोनरचे फायदे

टोनरमुळे त्वचा फ्रेश आणि पोर्स टाइट होतात. अशातच त्वचेवर ग्लो येतो. खरंतर, टोनरचा स्किन केअर रुटीनमध्ये वापर करणे फार महत्वाचे आहे. टोनरमुळे त्वचा हाइड्रेट राहण्यासह पीएच स्तर बॅलेन्स राहतो. क्लिंजिंगनंतर टोनरचा वापर केल्याने त्वचेवरील राहिलेला मेकअप, धूळ-माती हटवण्यास मदत होते. जाणून घेऊया घरच्याघरी कोणत्या 5 प्रकारचे टोनर तयार करू शकता याबद्दल सविस्तर...

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
कडुलिंबाचा टोनर
Image Credit : unsplasj

कडुलिंबाचा टोनर

कडुलिंबाच्या पानांपासून टोनर तयार करू शकता. यासाठी कडुलिंबाची पाने घेऊन स्वच्छ धुवा. यानंतर एका भांड्यात पाणी गरम करुन त्यामध्ये कडुलिंबाची पाने बुडवून उकळवा. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करुन पाणी गाळून घ्या. अशाप्रकारे कडुलिंबाचा टोनर तयार होईल. या टोनरमध्ये एक चमचा एलोवेरा जेलही मिक्स करु शकता. यामुळे पिंपल्सच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होईल.

Related Articles

Related image1
उन्हाळ्यात त्वचेचा रंग काळा झाल्यावर काय करावं? जाणून घ्या सोप्या टीप्स
Related image2
चेहऱ्यावरील वाढत्या पिग्मेंटेशनच्या समस्येवर 5 घरगुती उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक
37
काकडीचा टोनर
Image Credit : stockphoto

काकडीचा टोनर

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा फ्रेश आणि हाइड्रेट राहण्यासाठी काकडीचा टोनर तयार करू शकता. यासाठी काकडीचा रस काढून त्यामध्ये गुलाब पाणी, एलोवेरा जेलसह लिंबाचे काही थेंब घाला. सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स करुन स्प्रे बॉटलमध्ये भरा.

47
ग्रीन टी चे टोनर
Image Credit : Freepik

ग्रीन टी चे टोनर

पिंपल, एक्ने किंवा तेलकट त्वचेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी ग्रीन टी पासून टोनर तयार करा. या टोनरमुळे त्वचा फ्री रेडिकल्सपासून संरक्षित राहते. टोनर तयार करण्यासाठी ग्रीन टी पाण्यामध्ये उकळून घ्या आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर टी ट्री ऑइल त्यामध्ये मिक्स करा.

57
गुलाब टोनर
Image Credit : others

गुलाब टोनर

नॅच्युरल टोनर तयार करण्यासाठी गुलाबाचा वापर करू शकता. गुलाबांच्या पाकळ्यांपासून टोनर तयार करण्यासाठी पाकळ्या गरम पाण्यामध्ये उकळून घ्या. यानंतर गाळून स्प्रे बॉटलमध्ये त्याचे पाणी भरुन ठेवा. यामध्ये विच हेजर फ्लॉवरही मिक्स करू शकता.

67
तांदळाच्या पाण्याचे टोनर
Image Credit : Getty

तांदळाच्या पाण्याचे टोनर

स्किन केअर रुटीनमध्ये तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. टोनर तयार करण्यासाठी तांदूळ 6-7 तास उकळून घ्या आणि त्याला फेस येऊ द्या. यानंतर पाणी गाळून त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा.

77
असा वापरा टोनर
Image Credit : unsplash

असा वापरा टोनर

सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यानंतर डबल क्लीजिंग केल्यानंतर क्लींजर कॉटनवर घेऊन चेहरा स्वच्छ करा. हे टोनर चेहऱ्याला लावून घ्या. टोनर सुकल्यानंतर मॉइश्चराइजर त्वचेला लावा. खरंतर, टोनर रात्रीच्या वेळेस लावणे फायद्याचे ठरू शकते.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Recommended image2
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स
Recommended image3
Aluminium Foil For Plants : कुंडीतील झाडांसाठी ॲल्युमिनियम फॉइलचे ३ भन्नाट फायदे
Recommended image4
Gas Stove Low Flame : गॅस शेगडीची फ्लेम अचानक कमी झालीये? लगेच या ६ गोष्टी तपासा!
Recommended image5
Hair Care Tips : रोज हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? डॉक्टर काय सांगतात ते वाचा
Related Stories
Recommended image1
उन्हाळ्यात त्वचेचा रंग काळा झाल्यावर काय करावं? जाणून घ्या सोप्या टीप्स
Recommended image2
चेहऱ्यावरील वाढत्या पिग्मेंटेशनच्या समस्येवर 5 घरगुती उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved