उन्हाळ्यात त्वचेचा रंग काळा झाल्यावर काय करावं? जाणून घ्या सोप्या टीप्स
जर त्वचेचा काळेपणा खूपच वाढला असेल किंवा खाज, पुरळ, डाग पडत असतील, तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
17

Image Credit : social media
उन्हाळ्यात त्वचेचा रंग काळा झाल्यावर काय करावं?
चेहऱ्यावर वारंवार हात लावू नका, त्यामुळे त्वचेला संसर्ग होण्याची शक्यता वाढते. जर त्वचेचा काळेपणा खूपच वाढला असेल किंवा खाज, पुरळ, डाग पडत असतील, तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
27
Image Credit : google
लिंबू आणि मध
- लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म आहेत, तर मध त्वचेला मृदू बनवतो.
- कसं वापरावं: 1 चमचा लिंबाचा रस + 1 चमचा मध → हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, 10-15 मिनिटांनी धुवा.
37
Image Credit : Asianet News
काकडीचा रस
- काकडी त्वचेची जलन कमी करते आणि थंडावा देते.
- कसं वापरावं: काकडीचा रस चेहऱ्यावर कापसाच्या सहाय्याने लावा.
47
Image Credit : unsplash
बेसन + दही + हळद
- त्वचा उजळवण्यासाठी पारंपरिक उपाय.
- कसं वापरावं: 2 चमचे बेसन + 1 चमचा दही + चिमूटभर हळद → पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी धुवून टाका.
57
Image Credit : unsplash
टोमॅटोचा रस
टोमॅटो टॅनिंग कमी करतो. टोमॅटोचा रस थेट चेहऱ्यावर लावून 10 मिनिटांनी धुवा.
67
Image Credit : social media
सनस्क्रीन वापरणं आवश्यक
घराबाहेर पडताना SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. → दर 2-3 तासांनी परत लावा.
77
Image Credit : social media
भरपूर पाणी प्या
शरीर आणि त्वचेला हायड्रेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. → दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्यावं.

