डिग्रीशिवाय करिअर कसं सुरू करायचं, हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? फक्त मोबाईल आणि इंटरनेट वापरून खरंच पैसे कमावता येतात का? रिल्स आणि सोशल मीडिया तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतात का? जाणून घ्या अशा 5 जबरदस्त करिअर संधींबद्दल, ज्या तुमची कमाई आणि लाईफस्टाईल दोन्ही बदलू शकतात.

Creator Careers: आजच्या डिजिटल जगात फक्त डिग्री असणंच यशाची गुरुकिल्ली नाही. आता तुमच्याकडे फक्त एक स्मार्टफोन, इंटरनेट आणि काहीतरी नवीन करण्याची इच्छा असेल, तर तुम्हीही लाखो रुपये कमवू शकता. विशेषतः Gen Z साठी सोशल मीडियाने करिअरचे अनेक नवीन मार्ग उघडले आहेत. इंस्टाग्राम रिल्स (Instagram Reels), यूट्यूब शॉर्ट्स (YouTube Shorts) आणि फेसबुक रिल्स (Facebook Reels) यांसारख्या प्लॅटफॉर्म्सनी हे सिद्ध केलंय की, हा आता फक्त एक ट्रेंड नाही, तर एक पूर्णवेळ करिअर बनलं आहे. जर तुम्हीही डिग्रीशिवाय काय करावं या विचारात असाल, तर हे 5 क्रिएटर करिअर ऑप्शन्स तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

रील्स क्रिएटर (Reels Creator) - 15 सेकंदांची रील आणि जबरदस्त कमाई

आजच्या काळात इंस्टाग्राम रिल्स (Instagram Reels) हे कंटेंटसाठी सर्वात मोठं ठिकाण बनलं आहे. जर तुमची कॉमिक टायमिंग चांगली असेल, तुम्हाला डान्स किंवा ॲक्टिंग येत असेल किंवा तुमच्याकडे कोणतीही क्रिएटिव्ह स्किल असेल, तर तुम्ही रिल्स बनवून ब्रँड डील्स आणि फॉलोअर्सच्या माध्यमातून चांगली कमाई करू शकता. यामध्ये ब्रँड प्रमोशन, स्पॉन्सर्ड रिल्स आणि ॲफिलिएट मार्केटिंगमधून भरपूर पैसे मिळतात.

यूट्यूब शॉर्ट्स क्रिएटर (YouTube Shorts Creator) - एक व्हायरल व्हिडिओ आणि तुम्ही मालामाल

छोटे व्हिडिओ बनवून मोठी कमाई करणं आता खूप सोपं झालं आहे. YouTube Shorts वर व्हायरल होणारं कंटेंट तुम्हाला लवकर प्रसिद्धी मिळवून देऊ शकतं. यामध्ये YouTube मॉनेटायझेशन, ब्रँडसोबत कोलॅबोरेशन आणि शॉर्ट्स फंडमधून चांगली कमाई होते.

मीम्स क्रिएटर (Memes Creator) - विनोदातून बनवा हिट करिअर

जर तुमचा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त असेल, तर मीम्स (Memes) बनवणं तुमच्यासाठी एक परफेक्ट करिअर ऑप्शन असू शकतं. आज प्रत्येक ब्रँड आपल्या मार्केटिंगसाठी मीम्सचा वापर करत आहे. यामध्ये ब्रँडसाठी मीम कॅम्पेन तयार करून, पेज मॉनेटाइज करून आणि स्पॉन्सर्ड पोस्ट्सच्या माध्यमातून कमाई करता येते.

यूजर जेनरेटेड कंटेंट क्रिएटर (UGC Creator) - प्रसिद्धी आणि फॉलोअर्सशिवायही कमाई

UGC Creator म्हणजे 'यूझर जनरेटेड कंटेंट' तयार करणारे लोक. हे लोक ब्रँड्ससाठी खरे आणि नैसर्गिक वाटणारे व्हिडिओ बनवतात. यासाठी तुम्ही मोठे इन्फ्लुएन्सर असण्याची किंवा तुमचे खूप फॉलोअर्स असण्याची अजिबात गरज नाही. यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हिडिओसाठी पैसे मिळतात आणि काही वेळा प्रोजेक्टनुसार ठराविक रक्कमही मिळते.

क्रिएटिव्ह व्हिडिओ एडिटर (Video Editor) - प्रत्येक व्हायरल व्हिडिओमागचा सुपरस्टार

प्रत्येक व्हायरल व्हिडिओमागे एक चांगला व्हिडिओ एडिटर असतो. जर तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवर व्हिडिओ एडिटिंग शिकलात, तर ही एक हाय-डिमांड स्किल ठरू शकते. या स्किलच्या जोरावर तुम्ही फ्रीलान्सिंग, मोठ्या क्रिएटर्ससोबत कॉन्ट्रॅक्ट आणि एजन्सीसाठी काम करून तगडी कमाई करू शकता.