Health Tips : फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका हे 5 फूड्स, बिघडेल आरोग्य
मुंबई : फ्रीज म्हणजे अन्न टिकवण्यासाठी घराघरातला महत्त्वाचा भाग. पण काही अन्नपदार्थ असे आहेत जे फ्रीजमध्ये ठेवले तर जास्त काळ ताजे न राहता उलट लवकर कुजतात, त्यांच्यावर बुरशी वाढते आणि ते विषारी बनतात.

लसूण आणि कांदा
लसूण आणि कांदा फ्रीजमध्ये ठेवूच नये. हे नेहमी कोरड्या, हवेशीर जागेत साठवावेत. फ्रीजमधील ओलसर हवेमुळे लसूण व कांद्यावर बुरशी येते आणि ते लवकर कुजतात. अशा कुजलेल्या कांदा-लसूणामुळे पचन बिघडू शकतं आणि विषबाधाही होऊ शकते.
ब्रेड
फ्रीजमध्ये ठेवलेली ब्रेड काही वेळाने चिवट होते आणि त्यावर बुरशी लागण्याचा धोका वाढतो. ब्रेड नेहमी कोरड्या डब्यात आणि रूम टेंपरेचरला ठेवावी. ओलसर झाल्यावर ती लगेच खराब होते आणि आरोग्यास धोका निर्माण करते.
केळी
केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांच्या साली काळ्या पडतात आणि आतून कुजायला लागतात. अशा केळ्यांमध्ये पोषणमूल्य कमी होतं आणि त्या खाल्ल्यास पोटात गडबड होऊ शकते.
आले
फ्रीजमध्ये ठेवलेलं आले लवकर ओली होतं आणि त्यावर बुरशी निर्माण होते. त्यामुळे आले शक्यतो कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवावं. आले कुजल्यावर त्याचा वास आणि चव दोन्ही बिघडतात.
शिवजलेले अन्नपदार्थ
शिजवलेलं अन्न (भात, वरण, भाजी) फ्रीजमध्ये ठेवले तरी ते ३–४ तासांच्या आत गरम करून खाल्लं पाहिजे. १–२ दिवस फ्रीजमध्ये राहिलं तर त्यात बुरशी वाढू शकते. असं अन्न खाल्लं तर पोटदुखी, अॅसिडिटी, उलट्या होऊ शकतात.

