MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • World Osteoporosis Day : हाडांचं आरोग्य बिघडत असल्याची 5 लक्षणं, वेळीच ओळखा

World Osteoporosis Day : हाडांचं आरोग्य बिघडत असल्याची 5 लक्षणं, वेळीच ओळखा

दरवर्षी २० ऑक्टोबरला 'जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन' पाळला जातो. हाडांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 19 2026, 04:34 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
हाडांचं आरोग्य बिघडत असल्याची ५ लक्षणं
Image Credit : Getty

हाडांचं आरोग्य बिघडत असल्याची ५ लक्षणं

दरवर्षी २० ऑक्टोबरला 'जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन' पाळला जातो. हाडांचं आरोग्य, ऑस्टिओपोरोसिस आणि हाडांच्या इतर आजारांवर प्रतिबंध, निदान आणि उपचारांबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करणं हा यामागचा उद्देश आहे. या आजारात हाडं कमकुवत, पातळ आणि ठिसूळ होतात, ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका खूप वाढतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
सुमारे ४४.८% भारतीयांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यातील हाडांची झीज
Image Credit : Getty

सुमारे ४४.८% भारतीयांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यातील हाडांची झीज

'इंटरनॅशनल जर्नल ऑफ हेल्थ सायन्सेस'च्या मते, भारतातील सुमारे २२.९% प्रौढांना ऑस्टिओपोरोसिस आहे. लोक या आजाराला म्हातारपणाशी जोडतात, पण हाडांची झीज अनेकदा वयाच्या ४० व्या वर्षापासूनच सुरू होते. जवळपास ४४.८% भारतीयांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यातील हाडांची झीज दिसून येते. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे.

Related Articles

Related image1
RO चं पाणी पिताय? सावधान! शरीरातील हाडं ठिसूळ आणि मिनरल्सची कमतरता होतेय का? वाचा डॉक्टरांचा काय आहे सल्ला
Related image2
Bone Health Foods : हाडं मजबूत करण्यासाठी आहारात घ्या हे 7 पदार्थ
38
मेनोपॉजच्या उंबरठ्यावर असलेल्या महिलांना ऑस्टिओपोरोसिसचा धोका
Image Credit : Getty

मेनोपॉजच्या उंबरठ्यावर असलेल्या महिलांना ऑस्टिओपोरोसिसचा धोका

मेनोपॉजच्या (मासिक पाळी बंद होण्याच्या) उंबरठ्यावर असलेल्या महिलांना ऑस्टिओपोरोसिसचा सर्वाधिक फटका बसतो. वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत हाडांची घनता सर्वोच्च पातळीवर असते. त्यानंतर हार्मोनल बदलांमुळे (विशेषतः इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे) हाडांची घनता आणि वस्तुमान हळूहळू कमी होऊ लागतं. पण चाळिशीतच योग्य पावलं उचलल्यास भविष्यातील फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका टळू शकतो.

48
हाडं मोडणं हे पहिलं लक्षण
Image Credit : Getty

हाडं मोडणं हे पहिलं लक्षण

बहुतांश लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचं (हाडं ठिसूळ होणं) पहिलं आणि स्पष्ट लक्षण म्हणजे हाडं मोडणं किंवा त्यांना तडा जाणं. अगदी किरकोळ पडझड, धक्का लागणं किंवा साध्या हालचालींमुळेही हाडं मोडू शकतात.

58
वारंवार हाडांमध्ये किंवा सांध्यांमध्ये वेदना होणं
Image Credit : Getty

वारंवार हाडांमध्ये किंवा सांध्यांमध्ये वेदना होणं

तुम्हाला वारंवार हाडांमध्ये किंवा सांध्यांमध्ये वेदना होत असतील, तर ते हाडं कमकुवत झाल्याचं लक्षण असू शकतं. योग्य आहार आणि सप्लिमेंट्स घेऊन तुम्ही ही समस्या सोडवू शकता. या आजारात किरकोळ पडझड, वाकणं, वजन उचलणं किंवा अगदी जोरात खोकल्यामुळेही हाडं मोडू शकतात. विशेषतः नितंब, मनगट आणि पाठीच्या कण्यामध्ये असे फ्रॅक्चर जास्त होतात.

68
पोषक तत्वांची कमतरता आणि हाडांची घनता
Image Credit : Getty

पोषक तत्वांची कमतरता आणि हाडांची घनता

कठीण पृष्ठभागावर पडल्यावर फारसा मार न लागताही जर हाड मोडत असेल, तर ते 'बोन मिनरल डेन्सिटी' (हाडांची घनता) कमी असल्याचं लक्षण असू शकतं. शरीरातील पोषक तत्वांची कमतरता आणि हाडांच्या घनतेची पातळी यामुळे हाडं मोडण्याचा धोका वाढतो.

78
कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी ची कमतरता
Image Credit : Getty

कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी ची कमतरता

आहारात कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल, तर शरीरात पोषक तत्वं शोषून घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. ही कमतरता अशीच राहिली, तर हाडांची झीज वेगाने होते आणि हाडांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

88
कॅल्शियमयुक्त आहार घेणं फायदेशीर
Image Credit : Asianet News

कॅल्शियमयुक्त आहार घेणं फायदेशीर

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळेही हाडं कमकुवत होऊ शकतात. दिवसाला सरासरी ५ ते ६ हजार पावलं चालणं, डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेणं आणि कॅल्शियमयुक्त आहार घेणं या आजाराला दूर ठेवू शकतं. दूध, दही, नाचणी आणि पालेभाज्या यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराला पुरेसं कॅल्शियम मिळतं.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Rain Delay
SASA
(12.2 ov)20/2
AUSAUS
-
Day 2 - Session 2
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Instant Dosa : फक्त १० मिनिटांत बनवा कुरकुरीत डोसा, नेहमीचा डोसाही विसराल!
Recommended image2
Dasara Wishes 2026 : दसरा आणि विजयादशमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा खास मेसेज
Recommended image3
Cardamom Benefits : रोज वेलची खा आणि शरीराला निरोगी ठेवा!
Recommended image4
सिल्क साडीवर ट्राय करा या डिझाइन्सचे इअररिंग्स, खुलेल लूक
Recommended image5
Gold Rings : डेली वेअरसाठी परफेक्ट लूक देणाऱ्या सोन्याच्या अंगठ्या... पाहा डिझाईन्स
Related Stories
Recommended image1
RO चं पाणी पिताय? सावधान! शरीरातील हाडं ठिसूळ आणि मिनरल्सची कमतरता होतेय का? वाचा डॉक्टरांचा काय आहे सल्ला
Recommended image2
Bone Health Foods : हाडं मजबूत करण्यासाठी आहारात घ्या हे 7 पदार्थ
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved