सार
धारधार चाकू नसल्यास भाजी चिरणे कठीण होते. पण घरच्याघरी तुम्ही चाकूला धार काढू शकता. यासाठी काही सोपे हॅक्स वापरावे लागतील.
Knife Sharpening Hacks : भाजी कापण्यासाठी धारधार चाकू नसल्यास भाज्या व्यस्थितीत कापल्या जात नाहीत. यामुळे आई आधीच घरी 1-2 धार असणारे चाकू आणून ठेवते. वारंवार चाकूचा वापर केल्याने कालांतराने त्याची धार कमी होऊ लागते. अशाचच धार काढण्यासाठी दुकानदाराकडे जाण्याची वेळ येते. पण आता तुम्ही घरच्याघरी चाकूला धार काढू शकता.
अशी काढा चाकूला धार
मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये चाकूला घरच्याघरी धार कशी काढतात याबद्दल सांगितले आहे. चाकूला धार काढण्यासाठी सिरेमिक मगचा वापर करावा लागेल. यावर थोडे बटर लावून मीठ लावा. यानंतर चाकूला सेरेमिक मगवर 8 ते 10 वेळा जोरात घासा. अशाप्रकारे चाकूला धार काढली जाईल.
चाकूला धार काढण्याच्या अन्य ट्रिक
- घरबसल्या चाकूला धार काढण्यासाठी सँडपेपरचा वापर करू शकतो. यासाठी चाकूची धार असलेली बाजू सँडपेपरवर जोरात घासा. यामुळे चाकूला धार काढली जाईल.
- अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करूनही चाकूला धार काढता येते. यासाठी फॉइल पेपरचा गोळा तयार करा आणि चाकूवर घासा.
- काचेची फुटलेली बॉटल असल्यास त्यावर चाकू घासून धार काढू शकता.
आणखी वाचा :