नाचणीचे पीठ आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यापासून वेगवेगळ्या रेसिपी तयार केल्या जातात. पुढे जाणून घेऊया नाश्तासाठी नाचणीचा डोसाची सोपी रेसिपी...
1 वाटी नाचणीचे पीठ, अर्धी वाटी दही, आल-लसूण पेस्ट, मीठ चवीनुसार, जीरे पावडर, काळी मिरी पावडर, कांदा, हिरवी मिरची, गाजर आणि तेल.
सर्वप्रथम मोठ्या भांड्यात नाचणीचे पीठ काढून घेत त्यामध्ये दही मिक्स करा. यानंतर पीठात आलं-लसूण पेस्ट, जीरे पावडर, काळी मिरी पावडरसह पाणी घालून डोसाचे बॅटर तयार करा.
डोसा बॅटर 10 मिनिटांसाठी फर्मेंटेशनसाठी ठेवा. दुसऱ्या बाजूला डोसासाठी मसाला तयार करा. यामध्ये बटाटा, पनीर, हिरवे वाटाणे भाजून एका बाउलमध्ये काढून ठेवा.
नॉन-स्टिक तव्यावर एक चमचा तेल घालून गरम करा. यावर डोसा बॅटर घालून गोलाकार पद्धतीने पसरवा.
डोसावर चिरलेला कांदा, हिरवी मिरची, गाजर घालून घ्या आणि नंतर पनीर, वाटाण्याचे मिश्रण घालून पसरवा.
डोसा 10 मिनिटांसाठी भाजून द्या आणि नंतर एका प्लॅटमध्ये काढून चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.