चेहऱ्याला लावा हे 4 प्रकारचे Essential Oils, नितळ आणि चमकदार होईल त्वचा

| Published : Oct 18 2024, 09:03 AM IST

essential oil for skin

सार

हेल्दी स्किनसाठी काही इसेंशियल ऑइलचा वापर केला जातो. यामुळे त्वचा चमकदार आणि नितळ होण्यास मदत होते. पाहूयात कोणत्या 5 प्रकारचे इसेंशियल ऑइलचा वापर करावा याबद्दल सविस्तर...

Essential Oils for Healthy Skin : सध्याच्या काळात धूळ-माती, तेलकट पदार्थ अथवा प्रोसेस्ड फूडच्या सेवनामुळे त्वचेची चमक निघून जाणे सामान्य बाब आहे. बहुतांश महिला आपल्या डेली स्किन केअर रुटीन फॉलो करतात. पण काही कारणास्तव त्वचा हेल्दी राहत नाही. यामधील एक उपाय म्हणजे स्किन केअर रुटीनवेळी इसेंशियल ऑइलचा वापर न करणे. खरंतर, आपण लॅव्हेंडर, टी ट्री ऑइल, पेपरमिंट ऑइल अशा वेगवेगळ्या इसेंशियल ऑइलबद्दल ऐकतो. मात्र याचा वापर कधी केलाय का? जाणून घेऊया नितळ आणि चमकदार त्वचेसाठी इसेंशियल ऑइलचे काही फायदे सविस्तर...

इसेंशियल ऑइल म्हणजे काय?
इसेंशियल ऑइल म्हणजे झाडांवरील फुलं, पान, झाडाची साल अथवा झाडाच्या मूळांचा अर्क काढून तयार केले जाणारे तेल. यामध्ये काही नैसर्गिक गुणधर्म असतात. इसेंशियल ऑइलच्या मदतीने डोकेदुखी, तणाव अशा काही समस्यांपासून दूर राहू शकता.

इसेंशियल ऑइलचा असा करा वापर
इसेंशियल ऑइलचा वापर करताना त्यामध्ये काही थेंब नारळाचे तेल, जोजोबा अथवा बदामाचे तेल मिक्स करुन त्वचेला लावू शकता. यासाठी पाण्याने भरलेल्या एका स्प्रे बॉटलमध्ये इसेंशियल ऑइलचे काही थेंब टाका. चेहरा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्वचेवर इसेंशियल ऑइलचा स्प्रे करा. मॉइश्चराइजर अथवा सीरममध्येही इसेंशियल ऑइल मिक्स करु शकता.

लॅव्हेंडर इसेंशियल ऑइल
लॅव्हेंडर इसेंशियल ऑइल शांत आणि संतुलित गुणांसाठी ओखळले जाते. यामुळे स्ट्रेस आणि एंग्जायटीसारख्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते. याशिवाय त्वचा हेल्दी राहते.

टी-ट्री इसेंशियल ऑइल
टी-ट्री इसेंशियल ऑइलमध्ये अँटी-बॅक्टरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. या ऑइलमुळे त्वचेवर येणारे पिंपल्स, केसांमधील कोंडा आणि त्वचेसंबंधित समस्यांवर फायदेशीर ठरते.

मिंट इसेंशियल ऑइल
मिंट इसेंशियल ऑइलमध्ये शरिराला उर्जा देणारे गुणधर्म असतात. केसांच्या वाढीसह शरिरातील स्नायूंना आराम देण्यास हे ऑइल मदत करते.

रोजमेरी इसेंशियल ऑइल
रोजमेरी इसेंशियल ऑइलमध्ये सूज आणि रोगांविरुद्ध लढण्याची ताकद असते. घनदाट आणि हेल्दी केसांसाठी रोजमेरी इसेंशियल ऑइलचा वापर करू शकता.

आणखी वाचा :

बदलत्या वातावरणामुळे आजारी पडता? प्या हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे 10 ड्रिंक्स

आले आणि जिऱ्याची चहा पिण्याचे 5 आरोग्यदायी फायदे, वजनही होईल कमी