आल्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अन्य प्रकारचे व्हिटॅमिन असतात. याशिवाय जिऱ्यामध्ये लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6 असते.
आले आणि जिऱ्याची चहा तयार करुन प्यायल्यास शरिराला फायदा होतो. दररोज सकाळी उपाशी पोटी अशी चहा प्यायलाने कोणते फायदे होतात हे पाहूया...
वजन कमी करण्यासाठी आले आणि जिऱ्याची चहा पिऊ शकता. या दोन्हीमध्ये फायबर उच्च प्रमाणात असल्याने शरिरातील मेटाबॉलिज्मची प्रक्रिया सुधारले जाते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
आले आणि जिऱ्याची चहा प्यायल्याने पोटासंबंधित समस्या जसे की, गॅस, अपचन अशा समस्या दूर राहतात.
आल्यामुळे भूकेवर नियंत्रण मिळवण्यास मदत मिळते. तर जिऱ्यामुळे हंगर हार्मोन रेग्युलेट करण्यास मदत होते. याची चहा प्यायल्याने क्रेविंग्स कमी होतात.
आले आणि जिऱ्यामध्ये डिटॉक्सिफाइंग गुणधर्म असतात. यामुळे शरिराला सुरळीतपणे रक्तपुरवठा होतो आणि शरिरारातील घाण बाहेर काढण्यास मदत होते.
जीरे आणि आल्यामध्ये ब्लड शुगर कंट्रोल करण्याचे गुणधर्म असतात. यामुळे आले आणि जिऱ्याची चहा प्यायल्याने शरिरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.