MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • 1000 Days No Sugar : पहिल्या 1000 दिवसांत नो शुगर... अभ्यासात काय समोर आलंय?

1000 Days No Sugar : पहिल्या 1000 दिवसांत नो शुगर... अभ्यासात काय समोर आलंय?

1000 days - No sugar: जन्मानंतरच्या पहिल्या १,००० दिवसांत साखरेचा वापर टाळल्यास, भविष्यात कर्करोगाचा धोका ६९ टक्क्यांपर्यंत कमी करून निरोगी आणि दीर्घायुष्य मिळवता येऊ शकतं, असं एका अभ्यासात समोर आलंय.

2 Min read
Author : Karishma R
Published : Nov 29 2026, 03:08 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
बाळांसाठी १००० दिवस नो शुगर
Image Credit : This is a representative image generated using Gemini AI

बाळांसाठी १००० दिवस नो शुगर

बाळांनी त्यांच्या जन्माच्या पहिल्या १,००० दिवसांत साखरेचे पदार्थ पूर्णपणे टाळल्यास, भविष्यात कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून स्वतःचं संरक्षण करून निरोगी जीवन जगता येऊ शकतं, असं एका नवीन अभ्यासात समोर आलंय. ब्रिटनमधील 'यूके बायोबँक' (UK Biobank) या संस्थेनं सुमारे ६४,७६१ वृद्धांवर हा सविस्तर अभ्यास केलाय. माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या अशा पहिल्या १,००० दिवसांत, म्हणजेच गर्भधारणेपासून ते मूल दोन वर्षांचं होईपर्यंत, त्यांच्या आहारात साखरेचा काय परिणाम होतो, याचं परीक्षण या अभ्यासात करण्यात आलंय.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
अभ्यासातून समोर आलेले महत्त्वाचे निष्कर्ष:
Image Credit : This is a representative image generated using Gemini AI

अभ्यासातून समोर आलेले महत्त्वाचे निष्कर्ष:

दीर्घकालीन निरोगी खाण्याच्या सवयी - 

आयुष्याच्या पहिल्या १,००० दिवसांत साखर न खाल्लेली लोकं, मोठी झाल्यावरही साखरेचा वापर कमी प्रमाणात करतात. विशेषतः, ५० वर्षांनंतरही ते निरोगी आहाराच्या सवयी पाळत असल्याचं आढळून आलंय.

कर्करोगाचा धोका कमी - 

सुरुवातीच्या काळात साखर टाळणाऱ्यांना यकृताचा कर्करोग, कोलोरेक्टल कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका ३६% ते ६९% कमी असल्याचं आढळून आलंय.

वाढत्या वयाचा वेग कमी होतो - 

साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवल्यानं केवळ कर्करोगास प्रतिबंध होण्यास मदत होत नाही, तर शरीर लवकर वृद्ध होण्याचा वेगही कमी होतो.

Related Articles

Related image1
Vitamin A Vision Discovery : गर्भात बाळाची दृष्टी कशी तयार होते? 30 वर्षांचं कोडं सुटलं
34
साखरेमुळे होणारे दुष्परिणाम
Image Credit : This is a representative image generated using Gemini AI

साखरेमुळे होणारे दुष्परिणाम

लहानपणी सतत साखर खाल्ल्यानं शरीरात क्रॉनिक इन्फ्लेमेशन (Chronic Inflammation) निर्माण होतं. तसंच, यामुळे शरीरातील पेशींचं नुकसान करणाऱ्या तणावाला आमंत्रण मिळतं, जे भविष्यात अनेक आजारांना कारणीभूत ठरतं.

44
डॉक्टरांचा सल्ला
Image Credit : This is a representative image generated using Gemini AI

डॉक्टरांचा सल्ला

मुलांच्या निरोगी भविष्याचा पाया रचण्यासाठी, पालकांनी सुरुवातीपासूनच कृत्रिम आणि अस्वास्थ्यकर साखरेचे पदार्थ टाळावेत आणि नैसर्गिक पौष्टिक आहार द्यावा, असा सल्ला डॉक्टर देतात.

डिस्क्लेमर: हा लेख सार्वजनिक मंचावर/आम्ही संपर्क साधलेल्या तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. या लेखात नमूद केलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी तुमच्या फॅमिली डॉक्टर/हेल्थ प्रॅक्टिशनरचा सल्ला घ्या.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
1 Gram Gold Earrings : हलक्या 1 ग्रॅम सोन्याच्या 5 बेस्ट इयररिंग्ज डिझाइन्स
Recommended image2
Blouse Sleeve Designs : साडीला नवा लूक देणाऱ्या ब्लाउज स्लीव्ह डिझाइन्स
Recommended image3
Silver Mangalsutra : खिशाला परवडणारे आणि मॉडर्न डिझाईन्सचे 5 चांदीचे मंगळसूत्र
Recommended image4
Readymade Blouse : फक्त 300 रुपयांत मिळणाऱ्या भन्नाट रेडीमेड ब्लाऊज डिझाईन्स
Recommended image5
Rice Water For Hair : तांदळाचं पाणी कसं वापरायचं? केस भरघोस कसे वाढतील माहितीये का?
Related Stories
Recommended image1
Vitamin A Vision Discovery : गर्भात बाळाची दृष्टी कशी तयार होते? 30 वर्षांचं कोडं सुटलं
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved