सार
स्वप्न आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे. ज्योतिषमध्ये स्वप्न शास्र आहे. या ग्रंथामध्ये स्वप्नांसंदर्भात काही गुपित गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. याशिवाय स्वप्नांना अर्थ काय होते हे देखील सांगितले आहे.
Dreams and their meaning : प्रत्येक व्यक्तीला रात्री झोपताना कोणते ना कोणते स्वप्न पडते. खरंतर, स्वप्नांचे आपल्या आयुष्याशी सखोल नाते असते. स्वप्न शास्रानुसार, आपल्याला पडलेल्या प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो. हीच स्वप्न समजून घेतल्यास भविष्यात होणाऱ्या घटनांबद्दल अंदाज लावला जाऊ शकतो. यापैकी काही स्वप्न अशी असतात जी भविष्यात होणाऱ्या धनलाभाबद्दल शुभसंकेत देतात. अशाच काही स्वप्नांबद्दल पुढे जाणून घेऊया...
- एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये माचिस जळताना दिसल्यास त्याला अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते.
- व्यक्तीला स्वप्नात संत्र दिल्यासही धनलाभ होऊ शकतो.
- स्वप्नात पांढऱ्या रंगातील साप चावल्याचे दिसल्यास त्याला पैशांसंदर्भात गोड बातमी मिळू शकते.
- स्वप्नात स्वत: फळ किंवा फूल खाताना दिसल्यास हे देखील धनलाभाचे संकेत आहेत.
- ज्या व्यक्तीला स्वप्नात गाडलेले सोने किंवा अन्य मौल्यवान वस्तू दिसल्यास त्याला गुप्त धनलाभ होऊ शकतो.
- स्वप्नात गव्हाची शेती दिसणेही शुभ मानले जाते.
- स्वप्नात हिरे-मोती दिसणे म्हणजे देवी लक्ष्मी खुश असल्याचे संकेत आहेत.
- स्वप्नात एखाद्याला चेक लिहून दिल्याचे दिसल्यास त्याला वारशामध्ये धन संपत्ती मिळण्याचा योग असतो असे सांगितले जाते.
- स्वप्नात कुंभार घडा तयार करत असल्याचे दिसल्यासही धनलाभ होऊ शकतो.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
Chanakya Niti: कुटुंबातील आर्थिक व्यवहार कसे असावेत, चाणक्य सांगतात
Chanakya Niti: ही 5 कामे मृत्यूची कारणं ठरू शकतात, कधीही करू नका!