‘पंजायत-3’ सीरिज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. अशातच प्रेक्षकांना मिर्झापुरच्या सीरिजचे वेध लागले आहेत. याच सीरिजबद्दल अली फजलने एक हिंट दिली आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सोहळा क्रुजवर होणार असून यासाठी 800 हून अधिक पाहुणे येणार असल्याची चर्चा होती. अशातच पार्टीचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
प्रज्वल रेवन्ना भारतात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. बंगळूर विमानतळावरून SIT ने अटक केली असून त्याला न्य्यायालयापुढे सादर केले जाणार आहे. त्याला १४ दिवसांची कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बहुतांश महिलांना उन्हाळ्याच्या दिवसात व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर पुरळ येण्याची समस्या उद्भवते. यामुळे त्वचेला खाज येणे, त्वचा लाल होणे अथवा सूज येणे अशाही काही गोष्टींमुळे महिलांना त्रास होतो. यावर घरगुती उपाय काय याबद्दल जाणून घेऊया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचार कार्यात सर्वात जास्त धावपळ केली. त्यांनी प्रचाराच्या वेळेला २०० रॅली आणि जाहीर सभा, ८० मीडिया मुलाखती दिल्या. प्रचाराच्या काळात व्यस्त असताना मीडियाला पंतप्रधानांनी मुलाखत देण्यास प्राधान्य दिले.
प्रत्येक वर्षी 31 मे ला देशभरात ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ साजरा केला जातोय. यासंदर्भात प्रत्येक वर्षी वेगवेगळे आरोग्य शिबीरे, हेल्थ चेकअपच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण अभिनेता हृतिक रोशनने धूम्रपान करणाऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
मुंबईमध्ये मेगाब्लॉक केल्यामुळे ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्रीपासून रविवार दुपारपर्यंत हा मेगाब्लॉक चालणार असल्याचे सांगण्यात आले आहे. फलाट क्रमांकाची रुंद वाढवण्यासाठी हे करण्यात आले आहे.
हसन येथील खासदार प्रज्वल रेवन्ना भारतात दाखल झाला असून त्याला बंगळूर येथील विमानतळावरच अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयापुढे हजर केले जाणार असून ते किती दिवसांची शिक्षा ठरवतात त्यानुसार पुढील तपासाला दिशा मिळणार आहे.
प्रत्येकाच्या घरात दैनंदिन आयुष्यासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू असतात. याच वस्तूंचा दीर्घकाळ वापर केला जातो. पण तुम्हाला माहितेय का, मेकअप ब्रश ते कंगवा अशा काही वस्तूंची देखील एक्सपायरी असते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
दरवर्षी 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी 1987मध्ये हा दिवस पाळण्यास सुरुवात केली. तंबाखूचे दुष्परिणाम, त्यामुळे होऊ शकणारे रोग आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे.