THANE Lok Sabha Election Result 2024:ठाण्यात नरेश म्हस्के विजयी झाले असून राजन विचारे यांचा पराभव झाला आहे. नरेश म्हस्के 6,54,895 मतांनी विजयी झाले आहेत. तर राजन विचारे यांना 4,69,298 मते मिळाली.
Lok Sabha Election Result 2024: मोठी आघाडी घेत ओमराजे निंबाळकर प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील या मैदानात होत्या. त्याचा दारुण पराभव झाला.
Kolhapur Lok Sabha Chunav Results 2024: अत्यंत चुरशीने होत असलेल्या कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम होती. शाहू महाराज हे विजयी झाले असून शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक हे पराभूत झाले आहेत.
MUMBAI NORTH WEST Lok Sabha Election Result 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांनी विजय मिळवला असून त्यांनी अमोल गजानन कीर्तिकर यांना पराभूत केले.
YAVATMAL WASHIM Lok Sabha Election Result 2024: Yavatmal- Washim लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती आला आहे. SHS(UBT) चे उमेदवार Sanjay Uttamrao Deshmukh या निवडणुकीच्या लढतीचे विजेते ठरले आहेत.
HINGOLI Lok Sabha Election Result 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने (UBT) नागेश पाटील आष्टीकर Nagesh Patil Aashtikar विजयी झाले आहेत.
SHIRUR Lok Sabha Election Result 2024: शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांनी तब्बल 70 हजारांच्या मताधिक्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.
PUNE Lok Sabha Election Result 2024: राज्यातील लक्षवेधी असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून त्या ठिकाणी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे.
BHIWANDI Lok Sabha Election Result 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांचा दणदणीत विजय झाला आहे.
MUMBAI NORTH CENTRAL Lok Sabha Election Result 2024: उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव करत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी झाल्या आहेत.