अचानक सामुहिक रजेवर गेले एअर इंडिया एक्सप्रेसचे 300 कर्मचारी ; प्रवाश्यांचे हाल मात्र कर्मचाऱ्यांची नाराजी काय?

| Published : May 08 2024, 03:57 PM IST

air india express
अचानक सामुहिक रजेवर गेले एअर इंडिया एक्सप्रेसचे 300 कर्मचारी ; प्रवाश्यांचे हाल मात्र कर्मचाऱ्यांची नाराजी काय?
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी एअर इंडिया एक्सप्रेसच्या सुमारे 300 कर्मचाऱ्यांनी अचानक सीक लिव्ह टाकत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तसेच त्यांनी मोबाईल फोनही बंद केले होते. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

एअर इंडियाचे 300 कर्मचारी अचानक सीक लिव्हवर गेल्याने 82 उड्डाणे रद्द करावी लागली. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी एअर इंडियाच्या सुमारे 300 कर्मचाऱ्यांनी अचानक सीक लिव्ह घेतली आणि आपले मोबाइल फोन बंद केले. आजारपणाचे कारण सांगून कर्मचारी अचानक रजेवर का गेले? जाणून घ्या यामागील पाच कारणे. 

  1. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असे मानले जाते की कर्मचारी एअरलाइन्सच्या व्यवस्थापनाच्या कामावर खूश नाहीत आणि कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली जात आहे त्यावर ते खूप नाराज आहेत. याशिवाय टाटा समूहाने रोजगाराच्या नव्या अटीही यामागे कारणीभूत आहेत.
  2. एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया एशिया आणि विस्तारा हे सर्व टाटा समूहाचे भाग बनले आहेत. त्यामुळे रोजगाराच्या परिस्थितीतही बदल झाला आहे. गुणवत्ता पद्धतीसोबतच इतर अनेक अटीही आणल्या आहेत, ज्या जुन्या कर्मचाऱ्यांनी मान्य केल्या नाहीत. मोठ्या चर्चेनंतरही नवीन नोकरीच्या अटींबाबत कर्मचाऱ्यांमध्ये एकमत झालेले नाही.
  3. गेल्या महिन्यात, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या केबिन क्रूच्या एका विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनियनने आरोप केला होता की एअरलाइनचे व्यवस्थापन खराब होते आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत समानतेचा अभाव होता. अशा स्थितीत कर्मचारी नाराज होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्वजण एकत्र रजेवर गेले असावेत.
  4. एअर इंडिया एक्स्प्रेस एम्प्लॉईज युनियन (AIXEU) ही नोंदणीकृत युनियन सुमारे 300 क्रू मेंबर्सचे प्रतिनिधित्व करते आणि त्यात प्रामुख्याने वरिष्ठ कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की खराब व्यवस्थापनामुळे याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कामावर होत आहे.
  5. एप्रिलमध्ये एअर इंडियाने टाटा समूहाच्या अध्यक्षांना पत्र लिहिले होते. ज्यामध्ये एचआरएमुळे पगार कपातीबाबत सांगण्यात आले होते. याशिवाय कर्मचाऱ्यांना समान वागणूक दिली जात नसल्याचाही उल्लेख या पात्रात करण्यात आला होता. यासह अनेक समस्या पात्रातून मांडण्यात आल्या होत्या.

या पाच कारणांमुळे एअर इंडिया एक्स्प्रेसचे 300 कर्मचारी सामूहिक रजेवर गेले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.

82 विमानाचे उड्डाण रद्द झाल्यानंतर एअर इंडिया एक्स्प्रेसचे म्हणणे काय ?

प्रवक्त्यांनी सांगितले की, प्रवाशांना विनंती आहे की, त्यांनी विमानतळाकडे निघण्यापूर्वी त्यांच्या विमानाची सद्यस्थिती तपासून घ्यावी.82 विमान रद्द करण्यात आले आहे, त्यांना तात्काळ पैसे परत करण्याची सोय केली जाईल किंवा इतर तारखांचे तिकीट देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे म्हंटले आहे.

आणखी वाचा :

पूर्वेकडचे लोक चीन आणि दक्षिणेकडून आफ्रिकन दिसतात, सॅम पित्रोदा यांनी केलेल्या स्टेटमेंटमुळे वादाला फुटले तोंड

दैनंदिन पदार्थातून कॅन्सर होण्याची शक्यता ? तज्ज्ञांचा सल्ला काय ? वाचा सविस्तर