
Bisleri Causes Cancer : FSSAI
गोव्यात बिसलेरीच्या पाण्याच्या सहापैकी एका नमुन्यात ब्रोमेट आणि PAHs या रासायनिक घटकांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याने कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र, बिसलेरीने आपले पाणी सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, बाजारातील बनावट पाण्याचे ब्रॅण्ड, निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकचा वापर आणि आरोग्याला असणारा धोका यामुळे इतर कंपन्यांवरही FSSAI ने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.