
Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. राज्यातील 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करून 12 सवलती लागू केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ₹5000 आगाऊ मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून परीक्षा शुल्कमाफीच्या अटी हटवण्यात आल्या आहेत. बँकांना कर्जवसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश दिले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, GPS ट्रॅकिंग, अवैध पाणी जोडण्यांवर कारवाई आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या. कृषी वीजबिलाच्या थकबाकीसाठी तगादा लावू नये, असंही स्पष्ट केलं. तसेच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील 25 वर्षांबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करून महाराष्ट्रातील विकासकामांचा उल्लेख करण्यात आला.