सार
वसंत मोरे हे परत एकदा दुसऱ्या पक्षात जाणार असल्याचे दिसून आले आहे. सध्या सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग सुरु असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातून सुरुवातीला मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश केला.
वसंत मोरे हे परत एकदा दुसऱ्या पक्षात जाणार असल्याचे दिसून आले आहे. सध्या सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग सुरु असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातून सुरुवातीला मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश केला. त्यांनी पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती पण त्यांना येथे तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर ते शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचे ठरवले आहे. पुण्यावरून मुंबईला मातोश्रीवर जाताना वसंत मोरे हे शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
वसंत मोरे शक्तिप्रदर्शन करत जाणार मातोश्रीवर -
वसंत मोरे हे कार्यकर्त्यांसोबत शक्तिप्रदर्शन करत मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती समजत आहे. त्यांच्यासोबत नेते आणि कार्यकर्ते पक्षात प्रवेश करणार असून यामुळे पुणे शहरातील शिवसेना पक्षाला बळकटी मिळणार आहे. यावेळी बोलताना मोरे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात की, “माझं हे शक्तीप्रदर्शन पहिल्यांदा नाही. माझ्या मागे जनतेची शक्ती आहे ती शक्ती सातत्याने माझ्या पाठीमागे असते. कार्यकर्त्यांची ताकद वसंत मोरेंच्या पाठीमागे आहे. गेल्या १७ वर्षांपासून पुणे शहरात जे काही राजकारण सुरु आहे. आज जवळपास मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकारी बऱ्यापैकी आज माझ्यासोबत सर्वचजण प्रवेश करत आहेत.”
मी कोणालाही जबरदस्ती केली नाही -
मी कोणालाही जबरदस्ती केली नसल्याचे यावेळी वसंत मोरे यांनी म्हटले आहे. मी प्रत्येकाला सांगतोय की पक्षात येण्याचा आग्रह केलेला नाही. परंतू पक्षात जे राजकारण सुरु होतं, हे या सर्व पदाधिकाऱ्यांनी डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे कोणालाही जबरदस्ती न करता मी या सर्व पदाधिकाऱ्यांसह पक्षात प्रवेश करत आहेत. परंतू पक्षात जे राजकारण सुरु होतं, हे या सर्व पदाधिकाऱ्यांनी डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे कोणालाही जबरदस्ती न करता मी या सर्व पदाधिकाऱ्यांसह पक्षात प्रवेश करत आहेत.
आणखी वाचा -
अंधेरी सब-वे, हिंदमाता पुन्हा पाण्याखाली, पाणी न साचण्यासाठी बीएमसी करणार प्रयत्न
Alert : मुंबईत रेड अलर्ट, मुसळधार पावसामुळे आज शाळा-कॉलेज बंद, प्रत्येक रस्त्यावर गुडघाभर पाणी