सार
दुबईमध्ये मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे तेथील समाज जीवनावर परिणाम झाला आहे. या ठिकाणी विमानतळे, मॉल आणि रस्त्यावर पाणी साचले आहे, येथील विमानतळावर पाणी साचल्यामुळे विमानांच्या उड्डाणाला उशीर होत आहे.
दुबईमध्ये मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे तेथील समाज जीवनावर परिणाम झाला आहे. या ठिकाणी विमानतळे, मॉल आणि रस्त्यावर पाणी साचले आहे, येथील विमानतळावर पाणी साचल्यामुळे विमानांच्या उड्डाणाला उशीर होत आहे. त्यामुळे अनेक विमानांच्या उड्डाण वळवण्यात आली आहेत किंवा त्याचे पाणी दुसरीकडे वळवण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ग्राहकांची गरसोय होत आहे.
दुबई विमानतळ प्राधिकरणाने काय दिली माहिती? -
दुबई विमानतळावर बाकी वेळेला प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. येथून सर्वात जास्त प्रवासी हे विमानाने प्रवास करत असतात. पण आता विमानतळावर पूर आल्यामुळे येथील विमानाच्या उड्डाणांना उशीर होत असून प्रवाशांची गैरसोय होत आहे. दुबई विमानतळाच्या ट्विट करून माहिती दिली आहे.
दुबई विमानतळाने काय केले ट्विट? -
प्रवाशांनी फार आवश्यक नसल्याशिवाय विमानतळावर येऊ नये. फ्लाईट्स या विलंबाने आणि वळवल्या जात आहेत. कृपया तुमच्या एअरलाईन्सशी थेट तुमची फ्लाईटची स्थिती तपासायला हवे. आम्ही अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत शक्य तितक्या लवकर फ्लाईट चालू होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. याबाबत दुबईच्या ट्विटने माहिती दिली आहे.
दुबईमध्ये यावेळी विक्रमी पाऊस झाला आहे. असा पाऊस झाल्यामुळे फ्लाईटच्या परिस्थितीची माहिती तपासूनच प्रवाशांनी विमानतळावर येण्याचा निर्णय घ्यावा. पाऊस झाल्यामुळे येथील विमानतळावर मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. त्यामुळे विमानतळावर फ्लाईटला उशीर होत आहे. भारतातून पण दुबईकडे जाणारी अनेक फ्लाईट्स बंद करण्यात आली आहे.
आणखी वाचा -
RBI ची एकाचवेळी दोन बँकांवर मोठी कारवाई, खात्यातून केवळ 15 हजार रुपयांची रक्कम काढता येणार
अमित शाह यांच्या ऑफिसला लागली आग, गृह खात्याचे महत्वपूर्ण कागदपत्रे जळाल्याची शक्यता?