सार
केंद्रीय अर्थसंकल्प थेट कसा पहावा?
केन्द्रीय अर्थसंकल्पाला आता अवघा एक आठवडा शिल्लक आहे. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. मागील अर्थसंकल्पा प्रमाणेच यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प देखील कागदविरहित स्वरूपात सादर केला जाईल.
पुढील आर्थिक वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करण्याची औपचारिक प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू झाली. ३१ जानेवारी रोजी आर्थिक पाहणीच्या सादरीकरणाने अर्थसंकल्प सादरीकरणाची पार्श्वभूमी तयार होईल.
केंद्रीय अर्थसंकल्प थेट कसा पहावा?
२०२५-२०२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थेट सादर करताना संसद टीव्ही आणि दूरदर्शनवर पाहता येईल. थेट प्रक्षेपण त्यांच्या YouTube वाहिन्यांवरही उपलब्ध असेल. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो देखील त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण करेल.
केंद्रीय अर्थसंकल्प मोबाईल अॅप
संविधानाने अनिवार्य केलेल्या वार्षिक आर्थिक विवरणपत्राला अर्थसंकल्प म्हणून ओळखले जाते. “केंद्रीय अर्थसंकल्प मोबाईल अॅप” वर उपलब्ध होईल - खासदार आणि सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाची कागदपत्रे या माध्यमातून मिळतील. मोबाईल अॅपवर इंग्रजी आणि हिंदी भाषेत माहिती उपलब्ध असेल. तसेच, ते अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. www.indiabudget.gov.in या केंद्रीय अर्थसंकल्प संकेतस्थळावरून ते डाउनलोड करता येईल. १ फेब्रुवारी २०२५ रोजी संसदेत अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण झाल्यानंतर अर्थसंकल्पाची कागदपत्रे अॅपवर उपलब्ध होतील.