सार

बांगलादेशातील पर्यटकांना सेवा देणार नाही असे हॉटेल मालकांच्या संघटनेने जाहीर केले आहे. काही खाजगी रुग्णालयांनीही अशीच भूमिका घेतली आहे. त्रिपुरा सरकारने वीज बिलाची थकबाकी लवकरात लवकर भरण्याची भूमिका घेतली आहे.

दिल्ली : बांगलादेशातील पर्यटकांना राहण्यासाठी खोल्या देणार नाही, असे ऑल त्रिपुरा हॉटेल अँड रेस्टॉरंट्स असोसिएशन (ATHROA) ने म्हटले आहे. भारतीय ध्वजाला केलेल्या अपमानाच्या आणि हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या आणीबाणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, असे असोसिएशनचे सरचिटणीस बंध्योपाध्याय यांनी सांगितले.

भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि सर्व धर्मांचा आदर करते, असेही ते म्हणाले. "काही कट्टरपंथीयांनी मिळून आमच्या देशाच्या ध्वजाला अपमानित केले आणि अल्पसंख्याकांवर हल्ले केले". अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत, पण आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे, असे त्यांनी नमूद केले.