Travelling Tips: गोवा ट्रिप प्लॅन करणाऱ्या मुलींसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी
Travelling Tips: मित्रांसोबत गोवा ट्रिपला जाणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण केवळ मुली मुलीच गोव्याला जायचा बेत करत असाल तर, मजा करण्यासोबतच सुरक्षेची काळजी घेणेही खूप महत्त्वाचे आहे. ही काळजी नेमकी कशी घ्यायची याची माहिती असणे तितकेच महत्त्वाचे आहे.
17

Image Credit : stockPhoto
गोवा ट्रिप
गोव्याची नाईट लाईफ जगप्रसिद्ध आहे. पण, सुरक्षित आणि विश्वासार्ह क्लब निवडण्याची काळजी घ्या.
27
Image Credit : stockPhoto
गोव्यात फिरण्यासाठी असलेले पर्याय
गोव्यात फिरण्यासाठी तुम्ही वाहन भाड्याने घेऊ शकता. दिवसा स्कूटर आणि रात्री कार वापरणे अधिक सुरक्षित आहे.
37
Image Credit : stockPhoto
हॉटेलची निवड
तुम्ही राहत असलेले हॉटेल निर्जन ठिकाणी नसावे. यासाठी बुकिंग करण्यापूर्वी रिव्ह्यू नक्की तपासा.
47
Image Credit : stockPhoto
सोबत ठेवायच्या वस्तू
ऑफलाइन मॅप, लोकल सिम, पोर्टेबल वाय-फाय आणि पॉवर बँक नेहमी सोबत ठेवा. रेंजची समस्या आल्यास इतरांशी संपर्क साधण्यासाठी हे उपयुक्त ठरते.
57
Image Credit : stockPhoto
आपला ठावठिकाणा कोणालातरी कळवत जा
तुमचे प्रत्येक दिवसाचे प्लॅन्स जवळच्या मित्रांना किंवा घरच्यांना सांगणे चांगले राहील.
67
Image Credit : stockPhoto
माहिती गोळा करा
एखादे ठिकाण निवडण्यापूर्वी तेथील स्थानिक संस्कृती, नियम आणि हवामानाबद्दल माहिती गोळा करा.
77
Image Credit : stockPhoto
फर्स्ट-एड किट सोबत असावे
छोट्या जखमा किंवा भाजल्यास तात्पुरत्या आरामासाठी फर्स्ट-एड किट सोबत ठेवा.

