- Home
- India
- Hardest Languages To Learn : जगातल्या या 10 भाषा शिकणं म्हणजे लोखंडाचे चणे चावण्यासारखं आहे
Hardest Languages To Learn : जगातल्या या 10 भाषा शिकणं म्हणजे लोखंडाचे चणे चावण्यासारखं आहे
जगात हजारो भाषा बोलल्या जातात. पण काही भाषा शिकणं भल्याभल्यांना घाम फोडतं. अवघड लिपी, किचकट व्याकरण आणि उच्चारांमुळे या भाषा शिकणं हे विद्यार्थ्यांसाठी मोठं आव्हान असतं. जगातल्या सर्वात कठीण १० भाषा कोणत्या आहेत?

या १० भाषा शिकताना भल्याभल्यांना फुटतो घाम!
नवीन भाषा शिकणं हा नेहमीच एक भारी अनुभव असतो. पण काही भाषा शिकणं वाटतं तितकं सोपं नसतं. विशेषतः इंग्रजी बोलणाऱ्यांसाठी या भाषा शिकणं खूप कठीण जातं. किचकट व्याकरण, वेगळी लिपी आणि उच्चारांमधले बदल यामुळे या भाषा शिकताना चांगलाच कस लागतो. जगातल्या सर्वात कठीण टॉप १० भाषांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

मँडरिन चायनीज आणि अरेबिक
मँडरिन ही एक 'टोनल' भाषा आहे. म्हणजे तुम्ही शब्दाचा उच्चार कसा करता, यावर त्याचा अर्थ बदलतो. हजारो कॅरेक्टर्स आणि किचकट म्हणींमुळे ही भाषा शिकणं खूप अवघड जातं. अरेबिक भाषेचा विचार केला, तर ती उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. प्रदेशानुसार तिचे अनेक प्रकार आहेत. वाक्यात अक्षर कुठे येतं, त्यानुसार त्याचा आकार बदलतो. त्यामुळे मॉडर्न स्टँडर्ड अरेबिक शिकणं हे एक मोठं आव्हान आहे.
जपानी आणि हंगेरियन
जपानी भाषेत हिरागाना, काताकाना आणि कांजी अशा तीन प्रकारच्या लेखन पद्धती आहेत. या लक्षात ठेवायला खूप वेळ लागतो. या भाषेचं व्याकरण आणि बोलताना वापरले जाणारे आदरार्थी शब्द खूप वेगळे असतात. हंगेरियन भाषा शब्दांच्या क्रमावर नाही, तर 'केस सफिक्स'वर अवलंबून असते. वेगळे उच्चार आणि अनेक स्वर यामुळे ही भाषा शिकणं कठीण होतं.
कोरियन आणि फिन्निश
कोरियन भाषेची वाक्यरचना 'कर्ता-कर्म-क्रियापद' अशी असते. ही भाषा इतर कोणत्याही भाषा कुटुंबाशी जोडलेली नाही. यात अनेक आदरार्थी शब्द आहेत आणि एकाच उच्चाराचे अनेक शब्द असल्यामुळे शिकणाऱ्यांचा गोंधळ उडतो.
फिन्निश भाषेत भविष्यकाळ नसतो. पण यात जवळपास १५ प्रकारचे 'ग्रामॅटिकल केसेस' आहेत. यात 'a' किंवा 'the' सारखे आर्टिकल्स नसतात. इंडो-युरोपियन भाषांपेक्षा ही भाषा पूर्णपणे वेगळी आहे.
बास्क आणि नवाहो
बास्क आणि नवाहो या भाषा शिकणंही खूप कठीण काम आहे. या भाषा इतर भाषांपासून पूर्णपणे वेगळ्या आहेत. यातले शब्द खूप दुर्मिळ असल्यामुळे या भाषांची एक वेगळी ओळख आहे. नवाहो भाषेत वर्णनात्मक क्रियापदांचा जास्त वापर होतो. या भाषेच्या रचनेत अनेक प्राचीन नियमांचा समावेश आहे.
आइसलँडिक आणि पोलिश
आइसलँडिक आणि पोलिश भाषांचाही सर्वात कठीण १० भाषांच्या यादीत समावेश होतो. पोलिश भाषेचे उच्चार खूपच गुंतागुंतीचे असतात. याचं किचकट व्याकरण शिकणाऱ्यांना गोंधळात टाकतं. आइसलँडिक भाषेने आपली प्राचीन मुळं आजही जपून ठेवली आहेत. या जुन्या रचना आणि दुर्मिळ शब्दांमुळे या दोन्ही भाषा शिकणं हे एक मोठं आव्हान बनलं आहे.
