उत्तर प्रदेशातील रसौली रेल्वे स्टेशनजवळचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात तिकीट नसलेले शेकडो प्रवासी टीसी आणि पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी चक्क चालत्या ट्रेनमधून उड्या मारताना दिसत आहेत.

भारतात कायद्याची भीती कशी उरलेली नाही, हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. उत्तर प्रदेशात तिकीट तपासनीस (TTE) म्हणजेच टीसीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी लोकांच्या एका मोठ्या गर्दीने चक्क चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. रसौली रेल्वे स्टेशनवर ट्रेन पोहोचण्यापूर्वीच आतल्या एका प्रवाशाने हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला.

प्लॅटफॉर्मवर पोलीस उभे असल्याचं पाहून, स्टेशन येण्याआधीच तिकीट नसलेल्या प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे लोक थेट ट्रॅकवर उड्या मारून स्टेशनच्या बाहेर पळताना या व्हिडिओत दिसत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून लोक यावर संताप व्यक्त करत आहेत. अशाच घटनांमुळे उत्तर रेल्वेला (Northern Railways) तोटा सहन करावा लागतो, असं अनेक युजर्सचं म्हणणं आहे. तर काहींनी याला लोकांच्या 'नागरी जाणिवेचा अभाव' (lack of civic sense) म्हटलं आहे.

पाहा हा व्हायरल व्हिडिओ

"भारतीय रेल्वे आपला खर्च का वसूल करू शकत नाही, याचं हे उत्तम उदाहरण आहे," अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे.

रेडिटवर (Reddit) ‘u/Status_Candidate_392’ या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया काय?