सार

मुलगा होत नसल्याने सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेने तीन मुलींसह आत्महत्या केल्याची घटना भोपाळ पासून ३५ किमी अंतरावर असलेल्या गुंगा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रोडिया गावात घडली आहे.

भोपाळ: मुलगा होत नसल्याने सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेने तीन मुलींसह आत्महत्या केल्याची घटना भोपाळ येथे घडली आहे. यात चौघींचाही मृत्यू झाला आहे. यातील अडीच वर्षाच्या मुलीला रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचार दरम्यान तिचाही मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मात्र यात मृत्यू झालेल्या महिलेच्या भावाने सासरच्या लोकांवर आरोप केले आहेत.

भोपाळ पासून 35 किमी अंतरावर असलेल्या गुंगा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रोडिया गावात घडली आहे. हि बाब मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे. संगीता यादव यांच्यासह तीन मुलींचा समावेश आहे.

गुंगा पोलिस स्टेशनचे प्रभारी अरुण शर्मा यांनी सांगितले की, रायसेन जिल्ह्यातील संग्रामपूर येथील रहिवासी असलेल्या संगीता हिचा विवाह भोपाळमधील रोडिया गावातील रहिवासी रजत यादव याच्याशी 2018 मध्ये झाला होता. घटनास्थळाच्या तपासात प्राथमिक तपासात महिलेची आत्महत्या आणि त्यापूर्वी तीन मुलींची हत्या झाल्याची माहिती हाती आली आहे. या महिलेने आपल्या मुलींना गळफास लावून आत्महत्या केली. याआधी त्याने वहिनी मोनाला पाच मेसेज पाठवले होते. पहिला संदेश सोमवारी रात्री 12.24 वाजता आणि उर्वरित चार 12.55 वाजता पाठवण्यात आले होते.

संगीताच्या भावाचे सासरच्यांवर आरोप -

संगीताचा भाऊ नीरज यादव याने आपल्या बहिणीच्या सासरच्या लोकांवर मुलगा होत नसल्याचा छळ केल्याचा आरोप केला आहे. नीरजने सांगितले की, रात्री संगीताने मोबाईलवर एकामागून एक पाच मेसेज केले. ते मेसेज आम्ही सकाळी पाहिले तसेच एक मेसेज अत्यंत वाईट असल्याचेहि भावाने सांगितले आहे. मला वाटायचं आज नाही तर उद्या सगळं ठीक होईल. पण, आता मी विष खात आहे. कोणीही जिवंत राहणार नाही, प्रत्येकजण मरेल.असा मेसेज तिने नंदेला पाठवला आहे.

मेसेज पाहून फोन केले परंतु एकानेही माझे फोन उचलला नाही किंवा मेसेजचा रिप्लाय देखील केला नाही. तिसऱ्यांदा फोन उचलला तेव्हा मी विचारले की घरी सर्व काही ठीक आहे का? त्याने उत्तर दिले सर्व काही ठीक आहे. पण मला संशय आला त्यामुळे शेजारच्या गावातील मावशीच्या मुलाला फोन करून तिकडे जायला सांगितले. तो तिथे पोहोचल्यावर ते बघून तो एकदम हादरून गेला आणि त्यांनी मला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला मी लगेच पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मेव्हणा जीवे मरण्याची धमकी द्यायचा :

नीरजने सांगितले की, जेव्हाही बहीण तिच्या माहेरच्या घरी यायची तेव्हा मेव्हणा रजत यादव जीवे मारण्याची धमकी द्यायचा. तो म्हणायचा, मी घ्यायला येत नाही.तू वापस घरी ये नाही तर मी माझा अपघात करून घेईल किंवा विजेचा करंट लावून घेईल अश्या धमक्या द्यायचा. 4 मार्च रोजी धाकट्या बहिणीचे लग्न होते. या लग्नाला नशेत येऊन आत्महत्या केली होती. रात्रीच बहिणीला सोबत घेतले आणि निघून गेले.याचा परिणाम ताईच्या मनावर झाला आणि त्यातून तिने गळफास लावून घेतला आहे.

आणखी वाचा :

भावाच्याच पोटच्या पोरीची बहिणीने केली हत्या...बदल्याची आग मनात ठेऊन केले कृत्य

होळीच्या दिवशी दिल्लीत नवऱ्याने चिरला बायकोचा गळा, पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर बायको दिसली रक्ताच्या थारोळ्यात

भाजपने बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून रेखा पात्रा यांना दिले लोकसभेचं तिकीट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवाराला केला कॉल