मुंबई इंडियन्स संघातील वाद आला चव्हाट्यावर, हार्दिक पांड्या फलंदाजीला आल्यावर रोहित शर्माने सोडले मैदान

| Published : May 14 2024, 02:35 PM IST

Hardik Pandya_Rohit Sharma

सार

मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंमध्ये बेबनाव असल्याचे परत एकदा दिसून आले आहे. कर्णधार हार्दिक पांड्या सरावाच्या वेळी फलंदाजीला आल्यानंतर रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंनी मैदान सोडले आहे. 

मुंबई इंडियन्स संघाची यावर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी झालेली नाही. यावर्षी कर्णधार हार्दिक पांड्या हा रोहित शर्माच्या जागेवर आला असला तरी त्याची कामगिरी चांगली झालेली नाही. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या दोघ एकत्र सराव करत नसल्याचे बातमी समोर आले आहे. हार्दिक आणि रोहित यांनी एकत्र प्रवास केला नसून दोघेही एकत्र सराव करत नसल्याचे दिसून आले आहे. 

हार्दिक पांड्या नेटमध्ये असताना काय झाले? - 
हार्दिक पांड्या नेटमध्ये फलंदाजी करत असताना त्याच्याजवळ रोहित शर्मा किंवा इतर खेळाडू कोणीही जवळ नव्हते. रोहित शर्मा आणि अजित आगरकर हे दोघे हार्दिक पांड्याला वर्ल्ड कपच्या प्रमुख सामन्यांमध्ये घेऊ नका, अशा मतावर ठाम होते. पण निवड समितीच्या आग्रहामुळे हार्दिक पांड्याचा समावेश करण्यात आला असे सांगण्यात आले आहे. 

आयपीएलचा पुढील वर्षी नव्याने लिलाव होणार असून या लिलावात मुंबई इंडियन्स संघ रोहित शर्माला संघात ठेवण्याची शक्यता कमी आहे. अजूनही दुसरे काही आयपीएल संघ असून जे रोहित शर्माला संघात घेण्यास इच्छुक आहेत. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यावर मुंबई इंडियन्सचे फॅन्स नाराज झाले होते. त्यानंतर अनेक जणांनी मुंबई इंडियन्सच्या इंस्टाग्राम हॅण्डलला अनफॉलो केले होते. 

मुंबई इंडियन्स संघाची आयपीएलमधील कामगिरी - 
मुंबई इंडियन्स संघ 2024 मधील आयपीएलमध्ये एकूण 13 सामने खेळला असून यामधील नऊ सामन्यांमध्ये संघाला हार पत्करावी लागली आहे. मुंबई इंडियन्स संघाने चार संघांच्या विरुद्ध विजय मिळवला असून त्यांचा स्कोअर आठ राहिलेला आहे. त्यामुळे यावर्षी मुंबई इंडियन्स संघ प्ले ऑफमधून बाहेर जाणार असून हार्दिक पांड्या या पराजयाची जबाबदारी स्वीकारतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज केला दाखल, तिसऱ्यांदा खासदार होऊन बनणार देशाचे पंतप्रधान
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, कर्करोगामुळे लोकसभा निवडणूक प्रचारापासून होते दूर