केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि निवृत्तीवेतनधारकांमध्ये ८व्या वेतन आयोगाविषयी उत्सुकता असली तरी, सरकार सध्या यावर कोणताही निर्णय घेणार नाही.सरकारी सूत्रांनुसार सध्या यावर कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. 

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांमध्ये आणि निवृत्तीवेतनधारकांमध्ये 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून 8वा वेतन आयोग लागू होणार का, याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे.

तात्काळ कोणताही निर्णय घेतला जाणार नाही 

सरकारच्या सूत्रांनुसार, सध्या 8वा वेतन आयोग लागू करण्याचा कोणताही तातडीचा निर्णय घेतला जाणार नाही. केंद्र सरकारने या विषयावर अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, कर्मचारी संघटनांकडून सतत याची मागणी पुढे आणली जात आहे. त्यांना वाटतं की सध्याच्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांचा खर्च वाढला असून नव्या वेतन आयोगाची गरज भासत आहे. दुसऱ्या बाजूला, पेन्शनधारकांसाठीही 8वा वेतन आयोग महत्त्वाचा मानला जातो. वेतन आयोग लागू झाल्यास पेन्शनची गणना बदलते आणि रक्कम वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे निवृत्तीवेतनधारक देखील सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा करत आहेत.

महागाई भत्याबाबत दर ६ महिन्यांनी घेतला जातो 

निर्णय महागाई भत्त्याबाबत (DA) मात्र सरकार नियमानुसार दर सहा महिन्यांनी वाढीचा निर्णय घेते. महागाई निर्देशांक (AICPI) वाढत असल्यामुळे पुढील तिमाहीत डीए वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. डीए वाढल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन दोन्ही वाढतात. एकूणच, 8वा वेतन आयोग लागू करायचा किंवा न करायचा हा निर्णय सरकारकडेच आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही याबाबत सकारात्मक अपेक्षा आहेत. मात्र अद्याप अधिकृत घोषणा होईपर्यंत काहीही निश्चित म्हणता येत नाही.