सार

जम्मू काश्मीर येथील पूंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. यावेळी ५ जवान प्रतिउत्तर देताना जखमी झाले त्यांतील एक जवान उपचारादम्यान शहिद झाला आहे.या घटनेनंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी झाला आहे.

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर दहशवादी हल्ला झाल्याची घटना जम्मू काश्मीर मधील पूंछ जिल्ह्यातून समोर येत आहे. ऐन लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर हा हल्ला झाल्याने प्रशासन हाय अलर्ट झाले आहे. या हल्लामध्ये पाच जवान जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून एका जवान उपचारादरम्यान शहिद झाला आहे. घटनास्थळी भारतीय हवाई दलाचे विशेष दल गरुड तैनात करण्यात आलं आहे. भारतीय लष्कर आणि पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या या भागात पाठवण्यात आल्या असून भारतीय हवाई दलानेही याबाबत माहिती दिली आहे.

राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या स्थानिक तुकडीने परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम सुरू केली आहे.घटनास्थळावरील हवाई दलाची वाहने शाहसीतारजवळील एअरबेसच्या आत सुरक्षितपणे पोहोचवण्यात आली आहेत. हा दहशतवादी हल्ला पूंछ जिल्ह्यातील सुनारकोटच्या सेनाई गावात झाला. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास झाला असल्याचे काही वृत्तांनुसार सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर लष्कराच्या जवानांनीही प्रत्युत्तर दिलं. 2024 मधील प्रथमच हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दहशवादी हल्ला :

दरम्यान देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना हा हल्ला झाल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. या भागातील अनंतनाग-राजौरी-पुंछ या भागातील मतदान येत्या 25 मे ला मतदान होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय रायफल्स कसून चौकशी आणि शोध मोहीम करत आहे.

आणखी वाचा :

माजी विश्व बुद्धिबळ चॅम्पियन गॅरी कॉस्पोरोव्ह यांनी राहुल गांधींवर केली टिप्पणी, हा एक छोटासा विनोद होता…

Paris Olympic 2024: 'या' भारतीय खेळाडूंनी तिरंदाजीपासून ऍथलेटिक्सपर्यंत प्रत्येक गोष्टीत पात्रता मिळवली, कोण आहेत ते खेळाडू?