सार
T20 WC 2024, IND vs AFG : टी-20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या टप्प्यात आज भारताचा संघ सुपर-8 साठीचा पहिला सामना अफगाणिस्तान विरोधात खेळणार आहे. या दोन्ही संघांमधील सामना रात्री 8 वाजल्यापासून सामना सुरु होणार आहे.
India vs Afghanistan super 8 match : टी-20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या टप्प्यात आज भारताचा संघ सुपर-8 साठीचा पहिला सामना अफगाणिस्तान विरोधात खेळणार आहे. या दोन्ही संघांमधील सामना रात्री 8 वाजल्यापासून सामना सुरु होणार आहे.
टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 साठीची लढत सुरु झाली आहे. आज (20 जून) भारतीय संघाचा पहिला सुपर-8 सामना पार पडणार आहे. यावेळी भारताविरोधात अफगाणिस्तानचा संघाची लढत कॅन केंसिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बारबाडोस येथे होणार आहे आहे. क्रिकेटप्रेमींना भारताचा सामना रात्री 8 वाजल्यापासून पाहता येणार आहे. जाणून घेऊया भारत आणि अफगाणिस्तान संघामधील आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये किती वेळा सामना झालाय आणि आजचा सामना कसा होऊ शकतो याबद्दल सविस्तर...
भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघाचा रेकॉर्ड
भारत आणि अफगाणिस्तान संघादरम्यान टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण आठ सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे. भारताने आठपैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर एक सामना ड्रॉ झाला. म्हणजेच अफगाणिसतानला भारताविरोधातील सामन्यात एकही विजय मिळवता आलेला नाही. दरम्यान, टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अफगाणिस्तानचा संघ फार मजबूत असल्याचे दिसून येत आहे. संघाने एकामागोमा एक असे तीन सामने जिंकले आहेत. अफगाणिस्तानच्या संघाने न्यूझीलंडसारख्या संघाचाही 84 धावांनी पराभव केला होता. अशातच भारतीय संघाला सुपर-8 सामन्यासाठी जबरदस्त कामगिरी करावी लागणार आहे.
कुठे पाहाल सामना?
भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 चा सामना केंसिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बारबाडोस येथे सकाळी 10.30 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून पाहता येणार आहे. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. याशिवाय लाइव्ह स्ट्रिमिंग Disney+Hotstar वर होणार आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यासाठीचे संभाव्य खेळाडू
भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋष पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह.
अफगाणिस्तान संघ : रहमानुल्लाह गुरबाज़,इब्राहिम जादरान, गुलबदीन नायब, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, करीम जनत, राशिद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी.
आणखी वाचा :