मैथिली ठाकूर: लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असून, भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. २५ वर्षीय मैथिलीने लहान वयातच प्रचंड प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवली आहे.
लोकप्रिय अभिनेत्री मैथिली ठाकूर माध्यमांमध्ये चर्चेत आली आहे. तिने बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असून भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. आपण त्याच मैथिलीबद्दल आज माहिती जाणून घेणार आहोत.
मैथिली माथूर देशभरात प्रसिद्ध
मैथिली ठाकूरचे वय फक्त २५ वर्ष असून ती संपूर्ण देशभरात प्रचंड लोकप्रिय आहे. तिला लहान वयातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवलं होत. तिला कल्चरल एंबेसडर ऑफ द ईयर अवॉर्डने मैथिलीला गौरवण्यात आलं. सुरुवातीच्या काळात तिची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण नंतर तिची गायिका म्हणून ओळख झाल्यानंतर चांगले पैसे मिळायला सुरुवात झाली.
मैथिलीच्या बालपण कुठं गेलं?
मैथिलीचं बालपण हे बेनिपट्टी गावात गेलं. येथेच तिचा जन्म झाला असून तिला लहानपणापासून संगीताची आवड होती. तिची वडील संगीत क्लास चालवायचे. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली नव्हती पण तिने अथक परिश्रमातून पैसे कमावले आणि आपल्या घराची परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली. द रायझिंग स्टार या कार्यक्रमातून तिला प्रसिद्धी मिळाली.
सोशल मीडियावर झाली प्रसिद्ध
मैथिली ठाकूर ही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाली. इन्स्टाग्रामवर मैथिली ठाकूरला ६.३ मिलियन लोक फॉलो करतात. न्यूज१८ इंग्लिशनुसार, मैथिली एका शोसाठी ५,००,००० ते ७,००,००० रुपयांचं मानधन घेते. दर महिन्याला ती जवळपास १२ ते १५ शो करत असते. ती एक महिन्याला जवळपास १ कोटींपर्यंत पैसे कमवत असते. मैथिली ही सोशल मीडियावर एका पोस्टसाठी जवळपास ५० लाख रुपये घेते.


