सार

सिद्धू मुसेवालाच्या आईने बाळाला जन्म दिला आहे. सिद्धूचे वडील बलकौर सिंग यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती पोस्ट केली आहे.

सिद्धू मुसेवालाच्या आईने बाळाला जन्म दिला आहे. सिद्धूचे वडील बलकौर सिंग यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती पोस्ट केली आहे. पंजाबमध्ये सिद्धूची दोन वर्षांपूर्वी मारेकऱ्यांनी हत्या केली होती. 

सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी बाळाला हातात घेतले आहे, बाजूला सिद्धूचा फोटो असून समोर केक दिसत आहे. या आनंदाच्या क्षणांसाठी त्यांनी खास सजावट केल्याचे आपल्याला दिसून येते.

View post on Instagram
 

सोशल मीडियावर सिद्धूच्या आईला मुलगा झाल्यानंतर त्याच्या नावाचा ट्रेंड फॅन्सने चालू केला आहे. सिद्धूचे फॅन संपूर्ण जगभरात असून त्याची हत्या झाल्यानंतर फॅन्सने हळहळ व्यक्त केली होती. गाण्यासाठी खासकरून सिद्धू प्रसिद्ध होता. पंजाबमध्ये निवडणुकीच्या काळात तो काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची अफवा उठली होती. 
आणखी वाचा - 
Bharat Jodo Yatra : मुंबईत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची होणार सांगता, महाविकास आघाडीचे नेते राहणार उपस्थित
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून दोन नवीन समन्स, आपच्या नेत्याने दिली माहिती