सार

राज्यसभेत मिलिंद देवरा यांनी लठ्ठपणावर चिंता व्यक्त केली आहे. मुलांमध्ये वाढत्या लठ्ठपणा आणि त्याच्या आर्थिक प्रभावावरही देवरा यांनी भाष्य केले. एवढेच नव्हे हेल्दी लाफस्टाइलबद्दलच्या मुद्दावरही मिलिंद देवरा यांनी जोर दिला. 

Anti Obesity Campaign : शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी राज्यसभेतील भाषणात अँटी ऑबेसिटी कॅम्पेनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले. देवरा यांनी म्हटले की, "आज आपण जर अमेरिकेचे उदाहरण घेतल्यास, तेथे लठ्ठपणा केवळ एक आरोग्यासंबंधित समस्या नाही तर एक मोठे आर्थिक संकटही आहे. भारताने अमेरिकेकडून काय शिकावे याबद्दलचे मुद्दे हाइलाइट करु इच्छितो."

आज अमेरिकेत 42 टक्के वृद्ध आणि 20 टक्के मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या आहे. केवळ दोन दशकांमध्ये लठ्ठपणाच्या समस्येत 30 टक्के वाढ झाली आहे. अमेरिकेत लठ्ठपणासंबंधित आजारासाठी 1.4 ट्रिलियन डॉलर्स खर्च केला जातो. हा खर्च अमेरिकेच्या जीडीपीच्या 7 टक्के आहे. अमेरिकेत तीनपैकी एक मृत्यू लठ्ठपणासंबंधित आजारामुळे होते. यामुळे भाराताला हा थेट संदेश आहे की, आपल्याला लठ्ठपणावर आता काम करावे लागणार आहे.

 

भारतात 5 वर्षात पुरुषांमधील लठ्ठपणा 23 टक्क्यांवर

मिलिंद देवरा यांनी राज्यसभेत पुढे बोलताना म्हटले की, प्रायमरी हेल्थ सर्व्हे डेटानुसार भारतात 5 वर्षांमध्ये पुरुषांमध्ये लठ्ठपणा 19 टक्क्यांवरुन 23 टक्क्यांवर पोहोचला आहे. महिलांमध्ये 21 टक्क्यांवर 24 टक्के झाला आहे. काहींनी कुपोषणाबद्दलही भाष्य केले. या प्रकरणात सरकारकडून उत्तम काम केले जात आहे. ग्रामीण परिसरात 5 वर्षांमध्ये कमीत कमी तीन पैकी एक व्यक्ती कुपोषणाचा शिकार झाला आहे.

दुसऱ्या बाजूला शहरांमधील मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या दिसून येत आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये अधिक वजन असलेल्या मुलांमधील आकडा 60 टक्क्यांनी वाढला आहे. वर्ष 2030 पर्यंत भारतात लठ्ठपणासंबंधित आजारांवर होणारा खर्च जीडीपीच्या 1.6 टक्क्यांवर पोहोचला जाऊ शकतो. हा वर्षाला 7 लाख कोटी रुपये होऊ शकतो. देवरा यांनी पुढे म्हटले की, लठ्ठपणा एक आरोग्यासंबंधित समस्या नसून गंभीर आर्थिक आव्हानही आहे. यावर वेळीच आळा न घातल्यास उपचारासाठी खर्च वाढेल आणि प्रोडक्टिव्हिटी कमी झाल्याने दीर्घकाळासाठी भारताच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो.

लठ्ठपणावर कसे नियंत्रण मिळवाल?

लठ्ठपणावर नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करावी. यासाठी शारीरक हालचाल करणे आवश्यक आहे. हेल्दी आहाराचे सेवन करावे आणि पुरेशी झोप घ्यावी. सॉफ्ट ड्रिंक्सपासून दूर रहावे. लठ्ठपणामुळे आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. यामध्ये अनुवांशिक, अनहेल्दी फूड, शारीरिकरित्या अ‍ॅक्टिव्ह न राहणे अशा काही गोष्टींचा समावेश आहे. लठ्ठपणावर आळा घालण्याची सुरुवात लहान मुलांपासून केली पाहिजे.

लहान मुलांमधील लठ्ठपणावर कसे नियंत्रण मिळवावे?

लठ्ठपणाची सुरुवात लहानपणापासूनच होते, रिसर्चनुसार, एखादा व्यक्ती वयाच्या 5 व्या वर्षात लठ्ठपणाचा शिकार झाल्यास त्याला तरुणपणी देखील लठ्ठपणाचा सामना करावा लागू शकतो. एखादे मुलं वयाच्या 5 व्या वर्षी लठ्ठपणाचा सामना करत नसेल तर त्यामध्ये लठ्ठपणाची जोखिम कमी असते.