किल्ले रायगडावर ‘तुतारी’ वाजली, शरद पवार गटाच्या चिन्हाचे अनावरण

| Published : Feb 24 2024, 03:43 PM IST / Updated: Feb 24 2024, 03:52 PM IST

शरद पवार यांच्या पक्षाचे चिन्ह तुतारी

सार

शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह देण्यात आले आहे. त्याचे अनावरण रायगड किल्ल्यावरून करण्यात आले. 

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) या गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. या चिन्हाचे अनावरण पक्षाच्या वतीने रायगड किल्यावर जाऊन करण्यात आले. यावेळी किल्यावर भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार यांच्या हस्ते या चिन्हाचे अनावरण करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला गेले. त्यामुळे शरद पवार यांनी नवीन चिन्ह आणि नावासाठी अर्ज केला होता. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तीन चिन्ह सुचविण्यास सांगितले होते. पण त्यांनी सुचवलेल्या पैकी एकही चिन्ह न देता तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले आहे.

पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे ऐतिहासिक चिन्ह मिळाल्याचा दावा सगळीकडून केला जात आहे. या चिन्हाचा अनावरण सोहळा रायगड किल्यावर झाला. यावेळी किल्ला चढणे शरद पवार यांना शक्य नसल्यामुळे त्यांना पालखी आणि रोपवे या प्रवासाने शरद पवार हे गडावर पोहचले.

शरद पवार यांनी जनतेशी बोलताना सांगितलं की, “सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. निवडणूक आयोगाने रणशिंग फुकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलोय. याठिाकणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया.”

आणखी वाचा : 
UP : ट्रॅक्टर-ट्रॉली तलावामध्ये उलटून घडली मोठी दुर्घटना; 22 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
जम्मू काश्मीरमधील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता याना मीरने UK संसदेत दिले धडाकेबाज भाषण (Watch Video)
Sudarshan Setu :पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारका येथील सुदर्शन पुलाचे उद्घाटन करणार, पूल बांधण्यासाठी आला 980 कोटींचा खर्च