Sandeshkhali Row : तृणमूल काँग्रेस नेता शाहजहां शेख याला अटक, ईडीच्या पथकावर हल्ला केल्यानंतर झाला होता फरार

| Published : Feb 29 2024, 10:30 AM IST / Updated: Feb 29 2024, 10:33 AM IST

Shahjahan Sheikh

सार

संदेशखळी हिंसा प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. तृणमूल काँग्रेस नेता शाहजहां शेख याला गुरुवारी (29 फेब्रुवारी) अटक करण्यात आली आहे.

Sandeshkhali Row : संदेशखळी हिंसा प्रकरणात तृणमूल काँग्रेस नेता शाहजहां शेख याला गुरुवारी (29 फेब्रुवारी) सकाळी अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील पोलिसांद्वारे कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयनांतर शाहजहांला अटक करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने म्हटले होते की, तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहां शेख याच्या अटकेसाठी कोणतीही बंदी नसणार आहे.

तृणमूल काँग्रेस नेता शाहजहां शेख याच्यावर काही महिलांनी संदेशखळी येथे लैंगिक शोषण आणि जमिनी बळकावल्याचा आरोप लावण्यात आला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर शाहजहां याने पळ काढला होता.

संदेशखळी हिंसाचारातील मुख्य आरोपी असलेल्या शाहजहां शेखला 5 जानेवारीला ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या (FIR) आधारावर अटक करण्यात आली होती. या प्रकरणाबद्दल अधिक माहिती देत वरिष्ठ पोलीस अधिकारी अमीनुल इस्लाम खान यांनी म्हटले की, 53 वर्षीय तृणमूल नेत्याला उत्तर 24 परगनाच्या मिनाखाना परिसरातून अटक करण्यात आली आहे. आज शाहजहां शेखला बशीरहाट कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

5 जानेवारीपासून फरार होता शहाजहां शेख
संदेशखळीत मोठ्या संख्येने महिलांनी शाहजहांसह त्याच्या समर्थकांनी जबरदस्ती जमिनी बळकावण्यासह लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला होता. यानंतर शेख आणि त्याच्या समर्थकांच्या अटकेची मागणी करत संदेशखळीत एका महिन्यापेक्षा अधिक काळ आंदोलन करण्यात येत होते.

दरम्यान, शाहजहां गेल्या 5 जानेवारीपासून फरार होता. याशिवाय शाहजहांवर कथित रुपात ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता, जे 5 जानेवारीला एका घोटाळ्यासंबंधित त्याच्या निवासस्थानी तपासणी करण्यासाठी गेले होते.

संदेशखळी प्रकरणात मोठा खुलासा असा झाला होता की, तृणमूल नेता आणि समर्थक आदिवासी परिवारांचे लैंगिक शोषण आणि जमिनी बळकवायचा. या प्रकरणात नेत्यासह समर्थकांच्या विरोधात 50 तक्रारी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाला मिळाल्या होता. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, त्यांना जवळजवळ 1250 तक्रारी मिळाल्या आहेत, त्यापैकी 400 तक्रारी जमिनीच्या मुद्द्याशी संबंधित आहेत.

आणखी वाचा : 

Sandeshkhali Case : ममता बॅनर्जी संदेशखळीतील कोणते सत्य लपवण्याचा करताहेत प्रयत्न? BJPने जारी केली डॉक्युमेंट्री

Satyapal Malik : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर CBIचा छापा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा केल्याने AIMIM नेते असदुद्दीन ओवैसी यांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले.…