सार

PF Interest Rate : पीएफवरील व्याजदरामध्ये वाढ झाल्याने 6 कोटींहून अधिक पीएफधारकांना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी मार्च 2023मध्ये EPFO​ने वर्ष 2022-23 करिता EPFवरील व्याजदर 8.15 टक्के इतका केला होता.

PF Interest Rate : सरकारने नोकरदारांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. नोकरदारांच्या पीएफवरील व्याजामध्ये वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. EPFO​​ने शनिवारी (10 फेब्रुवारी) देशातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठी भेट देत वर्ष 2023-24 करिता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर 8.25 टक्के इतका केला आहे. मागील तीन वर्षांतील हा सर्वोच्च व्याजदर असल्याचे म्हटले जात आहे. 

नवे व्याजदर कधी लागू होणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, EPFOची सर्वोच्च संस्था ‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी’ (CBT) ने शनिवारी घेतलेल्या बैठकीमध्ये वर्ष 2023-24 साठी EPFवर 8.25 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. CBTच्या या निर्णयानंतर वर्ष 2023-24 साठी EPF ठेवींवरील व्याजदरास संमती मिळावी, यासाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल.

यापूर्वी पीएफवर किती टक्के होता व्याजदर?

  • मार्च 2023मध्ये EPFO​​ने वर्ष 2022-23साठी EPF वरील व्याजदर 2021-22 मध्ये 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्के केला होता.
  • मार्च 2022मध्ये EPFO​​ने सहा कोटींहून अधिक नोकरदारांसाठी वर्ष 2021-22साठी EPFवरील व्याजदर 40 वर्षांमधील सर्वात कमी म्हणजे 8.1 टक्के इतका देण्यात आला होता.
  • यानंतर वर्ष 2020-21मध्ये EPFवरील व्याजदर 8.5 इतका होता.
  • वर्ष 1977-78 मध्ये ईपीएफवरील व्याजदर 8 टक्के होता.

आणखी वाचा

काँग्रेसने देशाचा विकास मंदावला, आम्ही विक्रमी वेगाने केले काम - PM नरेंद्र मोदी

Bengal: TMC नेत्याच्या अटकेची मागणी, आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने या भागात इंटरनेटसेवा बंद

पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी नेत्यांना पाजले ज्ञानामृत, लोकशाही यशस्वी करण्यासाठी करावे लागेल हे काम