सार

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडे सर्वांचे लक्ष लागलेलं होते. या संघाने कर्णधार रोहित शर्माला बदलून हार्दिक पांड्याला कर्णधार केले असून यामुळे चाहत्यांमध्ये सामन्याच्या दरम्यान रोष पाहायला मिळतो आहे

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडे सर्वांचे लक्ष लागलेलं होते. या संघाने कर्णधार रोहित शर्माला बदलून हार्दिक पांड्याला कर्णधार केले असून यामुळे चाहत्यांमध्ये सामन्याच्या दरम्यान रोष पाहायला मिळतो आहे. या संघाने आयपीएलच्या या मोसमातील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. 

दिल्ली संघाच्या विरोधात मुंबई इंडियन्स संघाने हा पहिला विजय मिळवला आहे. रोहित शर्माने केलेल्या खेळीमुळे संघाला हा विजय मिळवता आला असे यामध्ये सांगण्यात आले. त्याला ड्रेसिंग रूममध्ये याबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना रोहित शर्माने भावना व्यक्त केल्या आहेत. 

रोहित शर्मा सांगतो की, "फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून दाखवली. अशाच प्रकारे कामगिरी करून दाखवावी अशी सर्वांचीच पहिल्यापासून इच्छा होती. वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरी कशी झाली ते आपण समजावून घ्यायला हवे. आपण सर्वजण विजय साकारू शकलो यामध्येच आपण जिंकलो होतो. 
आणखी वाचा - 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची का सोडली साथ? उद्धव ठाकरे नेत्यांना द्यायचे अशी वागणूक
पानाच्या दुकानावर झालेल्या भांडणातून महाराष्ट्रात झाला खून, नेमकं घडलं काय?