MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Rapido Rider: रॅपीडो राईडमध्ये तरुणीसोबत गैरवर्तन

Rapido Rider: रॅपीडो राईडमध्ये तरुणीसोबत गैरवर्तन

Rapido Rider Suspended After Assam Woman Alleges Misconduct in Viral Video: एका तरुणीने रॅपीडो राईड दरम्यान बाईक टॅक्सी चालकाने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Feb 23 2026, 03:09 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
Assam woman alleges inappropriate touching during Rapido ride
Image Credit : instagram

Assam woman alleges inappropriate touching during Rapido ride

आसाममधील एका तरुणीने रॅपीडो राईड दरम्यान बाईक टॅक्सी चालकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ आणि संपूर्ण घटना शेअर केली. चालकाने पाठीला खाजवण्याच्या बहाण्याने तिला वारंवार स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, असं तिने म्हटलं आहे. या पोस्टमुळे ऑनलाइन तीव्र प्रतिक्रिया उमटत असून कंपनीनेही याची दखल घेतली आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
What the woman said happened
Image Credit : Instagram

What the woman said happened

तिच्या पोस्टनुसार, तिने ऑफिस सुटल्यावर रॅपीडो बुक केली. सुरुवातीला प्रवास सामान्य होता, पण नंतर चालकाने हाताने तिला अनेकदा स्पर्श केला. सुरुवातीला तिला वाटलं की तो फक्त पाठ खाजवत आहे. पण दुसऱ्यांदा असं झाल्यावर तिने मोबाईलवर घटनेचं रेकॉर्डिंग सुरू केलं. तिने लिहिलंय की, स्पर्श टाळण्यासाठी ती बाहेरच्या बाजूला झुकली, पण चालक तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतच राहिला. त्याने तिचं घर कुठे आहे, ती एकटी राहते की शेअरिंगमध्ये, आणि कुठे काम करते असे वैयक्तिक प्रश्नही विचारले. यामुळे तिला खूप असुरक्षित आणि अस्वस्थ वाटलं.
35
Rider details and company response
Image Credit : Instagram

Rider details and company response

तरुणीने तिच्या पोस्टमध्ये अॅपवर दिसणारं रायडरचं नाव 'अनिश कुमार राऊत' असल्याचं सांगत कंपनीला टॅग केलं. रॅपीडोने यावर प्रतिसाद देत, घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आणि राईडची माहिती शेअर करण्यास सांगितलं. नंतर कंपनीने सांगितलं की, त्या रायडरला कायमचं निलंबित केलं असून त्याची कागदपत्रं ब्लॅकलिस्ट केली आहेत. गरज पडल्यास कायदेशीर मदतही दिली जाईल, असं आश्वासन कंपनीने दिलं. तरुणीने अधिकृत मार्गाने तक्रार केल्याचं म्हटलं आहे. मात्र, रायडरला तिचं घर आणि कामाची जागा दोन्ही माहीत असल्याने, सुरक्षेच्या कारणास्तव तिने सध्या एफआयआर (FIR) दाखल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
45
Online reactions and debate
Image Credit : Instagram

Online reactions and debate

हा व्हिडिओ ऑनलाइन खूप चर्चेत आला. अनेक युझर्सनी तरुणीला पाठिंबा दिला आणि म्हटलं की अशा तणावपूर्ण परिस्थितीत माणसं गोंधळून जातात. तर काहींनी, तिने रायडरला लगेचच जाब का विचारला नाही, असं म्हणत तिलाच दोष दिला. अनेक युझर्सनी कठोर कारवाईची मागणी केली आणि अॅपद्वारे तक्रार करून कमी रेटिंग देण्याचा सल्ला दिला. तरुणीने स्पष्ट केलं की अंतर फक्त 0.4 किमी होतं आणि तिने वेळेच्या सोयीसाठी बाईक टॅक्सी निवडली होती, पैशांसाठी नाही. स्कूटरवर पुरेशी जागा होती आणि तो स्पर्श मुद्दाम केलेला होता, असंही तिने सांगितलं.
55
Safety concerns and awareness
Image Credit : Instagram

Safety concerns and awareness

या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये प्रवाशांची सुरक्षा, मर्यादा आणि आदराने वागण्याचे महत्त्व यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, जागरूकता आणि वेळेवर तक्रार करणे महत्त्वाचे आहे. तसेच, कंपन्यांनी तक्रारींवर तातडीने कारवाई केली पाहिजे. या व्हिडिओशी संबंधित कोणत्याही पोलीस केसबद्दल अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतंही सार्वजनिक निवेदन जारी केलेलं नाही.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Now Playing
Devendra Fadnavis | दुष्काळग्रस्तांना ₹5000 देणार | Drought Relief
Recommended image2
Now Playing
Eknath Shinde | शेतकऱ्यांना ₹5000 मदत - एकनाथ शिंदेंची घोषणा | Drought Relief
Recommended image3
Now Playing
Chandrashekhar Bawankule | बिल्डरच्या बेकायदेशीर घराची नोंदणी नाहीच | unauthorized home
Recommended image4
Now Playing
CJP Abhijeet Dipke | दीपकेंच्या दोन सहकाऱ्यांना 5 दिवसांची कोठडी
Recommended image5
PM Kisan 24th Installment : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, २४ वा हप्ता खात्यात कधी येणार?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved