Rajshree Pan Masala Owner Kamal Kishores Daughter In Law : उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवासी असलेले कमला पसंद आणि राजश्री गुटख्याचे मालक कमल किशोर चौरसिया यांची सून दीप्ती यांनी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह दिल्लीतील घरात सापडला आहे.  

Rajshree Pan Masala Owner Kamal Kishores Daughter In Law : भारतातील टॉप ब्रँड पान मसाला कमला पसंद आणि राजश्री कंपनीचे मालक कमल किशोर चौरसिया यांची सून दीप्ती चौरसिया (40) यांनी आत्महत्या केली. मंगळवारी संध्याकाळी दिल्लीतील वसंत विहार भागातील घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली असून, अब्जाधीश कुटुंबातील महिलेला इतके मोठे पाऊल का उचलावे लागले, असा प्रश्न लोक विचारत आहेत.

आत्महत्येच्या चिठ्ठीत लिहिले मृत्यूचे कारण...

दिल्ली पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. ज्यात प्रेम आणि विश्वासघात याबद्दल लिहिले आहे. त्यात लिहिले आहे की, जर कोणावर प्रेम आणि विश्वास नसेल, तर अशा नात्याला काय अर्थ उरतो... आणि असे जगण्यातही काही अर्थ नाही. मात्र, सुसाईड नोटमध्ये दीप्तीने कोणावरही कोणताही आरोप केलेला नाही. पण, दीप्ती चौरसिया यांचा पती हरप्रीत चौरसियासोबत वाद सुरू असल्याची माहिती आहे. दीप्ती आणि हरप्रीत यांचे लग्न 2010 साली झाले होते. त्यांना 14 वर्षांचा एक मुलगाही आहे.

कोण आहेत पान मसाला कंपनीचे मालक कमल किशोर?

कमल किशोर हे मूळचे उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील फीलखाना येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पान मसाला कंपनीचा कारखानाही कानपूरमध्ये आहे. येथूनच देशभरात पान मसाल्याचा पुरवठा होतो. 80 च्या दशकात रस्त्याच्या कडेला एका टपरीवर सुटा पान मसाला विकणाऱ्या कमल किशोर यांचे आज गुटख्याचे अनेक ब्रँड आहेत, जे खेड्यांपासून शहरांपर्यंत विकले जातात.

गुटखा कंपनीचे मालक कमल किशोर किती संपत्तीचे मालक आहेत?

रस्त्याच्या कडेला पान मसाला विकणारे कमल किशोर एक दिवस या पान मसाल्याच्या व्यवसायातून अब्जाधीश होतील, असा कोणी विचारही केला नव्हता. त्यांच्या संपत्तीचा कोणताही निश्चित आकडा उपलब्ध नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार ते हजारो कोटींचे मालक आहेत. ते उत्पादन शुल्क (एक्साइज ड्यूटी) चोरीच्या आरोपांमुळेही चर्चेत आले आहेत. त्यांच्या कंपनीवर 147 कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्क चोरीचा आरोप आहे.

Disclaimer: आत्महत्या कोणत्याही समस्येवर उपाय नाही. तुमच्या मनात आत्महत्येचे किंवा स्वतःला इजा पोहोचवण्याचे विचार येत असतील, तर तुम्ही ताबडतोब कुटुंब, मित्र आणि मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. याशिवाय, तुम्ही या हेल्पलाइन क्रमांकांवर कॉल करूनही मदत मागू शकता. आसरा (मुंबई) 022-27546669, सुमैत्री (दिल्ली) 011-23389090, रोशनी (हैदराबाद) 040-66202000, लाइफलाइन 033-64643267 (कोलकाता). स्पंदन (मध्य प्रदेश) 9630899002, 7389366696, संजीवनी: 0761-2626622, TeleMANAS 1-8008914416/14416, जीवन आधार: 1800-233-1250. मानसिक तणाव असल्यास, समुपदेशनासाठी हेल्पलाइन क्रमांक 14416 आणि 1800 8914416 वर संपर्क साधून घरबसल्या मदत मिळवू शकता.