कार खरेदी करायची आहे? या आहेत बजेट फ्रेंडली बेस्ट फॅमिली कार, 5 पैकी 1 निवडा!
Top 5 best budget friendly family cars : तुम्ही बजेटमध्ये बसणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ह्या आहेत टॉप ५ बजेट कार्स. चांगला मायलेज आणि सेफ्टी फीचर्स असलेल्या या पाच लोकप्रिय कार्सची किंमत आणि वैशिष्ट्ये येथे जाणून घ्या.

कार खरेदी करण्याचा विचार आहे?
तुम्ही तुमच्या कुटुंबासोबतच्या प्रवासासाठी आणि बजेटमध्ये बसणारी कार शोधत आहात का? तर या पाचपैकी एक कार तुम्ही खरेदी करु शकता. या केवळ बजेट फ्रेडली नाहीत तर अत्याधुनिक फिचर्ससह येणार्या कार आहेत.
मारुती सुझुकी स्विफ्ट
मारुती स्विफ्ट बऱ्याच काळापासून कुटुंबांची आवडती कार आहे. तिची सुरुवातीची किंमत ५.७९ लाख रुपये आहे. ही कार २२ ते २४ किमी मायलेज देते. ९-इंच स्मार्ट टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल आणि सहा एअरबॅग्ज ही तिची वैशिष्ट्ये आहेत.
रेनॉ क्विड
तुमचे बजेट कमी असेल, तर ४.९२ लाखांपासून सुरू होणारी रेनॉ क्विड, विशेषतः लहान कुटुंबांसाठी एक उत्तम कार आहे. तिचे एसयूव्ही-स्टाईल डिझाइन आणि २०-२२ किमी मायलेजमुळे ती लोकप्रिय आहे. यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ८-इंच टचस्क्रीन आणि रिअर कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
ह्युंदाई ग्रँड i10 निओस
कुटुंबासोबतच्या प्रवासात आराम आणि प्रीमियम अनुभव हवा असणाऱ्यांसाठी ह्युंदाई ग्रँड i10 निओस आहे. अंदाजे ५.४७ लाख रुपये किमतीची ही कार १८-२१ किमी मायलेज देते. वायरलेस चार्जर, ऑटो एसी, ८-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि सहा एअरबॅग्ज ही तिची वैशिष्ट्ये आहेत.
टाटा टियागो
टाटा टियागो तिच्या उत्तम बिल्ड क्वालिटी आणि सुरक्षिततेसाठी ओळखली जाते. ४.९९ लाख रुपयांपासून सुरू होणारी ही कार १९ ते २३ किमी मायलेज देते. ७-इंच टचस्क्रीन, डिजिटल कन्सोल यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे ही एक व्हॅल्यू फॉर मनी कार ठरते.
होंडा अमेझ
तुमच्या कुटुंबासाठी अधिक जागा आणि आराम हवा असेल, तर होंडा अमेझ हा एक उत्तम सेडान पर्याय आहे. सुमारे ७ लाखांपासून सुरू होणारी ही कार १८ ते २० किमी मायलेज देते. मोठी बूट स्पेस आणि आरामदायी राईड क्वालिटी हे तिचे वैशिष्ट्य आहे.

