सार

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील पोस्टग्रॅज्युएट ट्रेनी डॉक्टरच्या हत्येच्या गुन्ह्यात एका महिला डॉक्टरने चक्रावून टाकणारा दावा केला आहे. 

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील पोस्टग्रॅज्युएट ट्रेनी डॉक्टरच्या हत्येच्या गुन्ह्यात एका महिला डॉक्टरने चक्रावून टाकणारा दावा केला आहे. आधी डॉक्टरला मारहाण करण्यात आली, नंतर लैंगिक हत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक आणि संबंधित विभागाचे प्रमुख यांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

भाजपा नेते अमित मालवीय यांचे ट्विट व्हायरल - 
भाजपा नेते अमित मालवीय यांचे ट्विट व्हायरल झाले असून यामध्ये एक महिला डॉक्टरने प्राचार्य, प्राध्यापक आणि अन्य स्टाफवर आरोप केल्याचं सांगण्यात आलं आहे. या व्हिडिओतील महिलेने कॉलेजमधील स्टाफबद्दल अनेक नवीन खुलासे केल्याचं सांगण्यात आलं आहे. या कॉलेजमधील विभाग प्रमुख आणि प्राचार्य विविध कारण देऊन डॉक्टरांकडून पैसे घेत असायचे. महिला डॉक्टरने यावेळी संदीप घोष यांच्या नावाचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. 

संदीप घोष हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचा दावा या डॉक्टरने यावेळी केला आहे. त्यांनी यामध्ये म्हटले आहे की, एका पार्टीने त्यांच्या या काळ्या धंद्यांसाठी फंडिंग केली होती. या ठिकाणी ड्रग्सचे खूप मोठे रॅकेट चालवले जात होते. या सर्व खुलाशांमुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झालं आहे.