सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी भारत आणि युक्रेन या दोन देशांची भागीदार मजबूत करण्यात यावा असा दोघांमध्ये संवाद झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी भारत आणि युक्रेन या दोन देशांची भागीदार मजबूत करण्यात यावा असा दोघांमध्ये संवाद झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारताच्या लोक केंद्रित दृष्टीकोनाचा पुनरुच्चार केला. शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारताकडून सर्वोतोपरी सहकारी केले जाईल असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

यावेळी भारत आणि युक्रेन या दोन पक्षांची आघाडी मजबूत राहणार असून शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही सांगितले. भारत युक्रेनने केलेल्या प्रयत्नांचे समर्थन करत असून युद्धावर अंतिम तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांसोबत संपर्कात राहणार असल्याचे सांगितले. सर्वात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनच्या मानवतावादी दृष्टीकोनाचे कौतुक केले आहे. त्यामुळे भविष्यात युक्रेन आणि भारताचे संबंध चांगले राहतील हे लक्षात घ्यावे लागेल.
आणखी वाचा -
रशियाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल व्लादिमवीर पुतीन यांचे नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक, संपर्कात राहण्याचे केले मान्य
Loksabha Election : निवडणूक प्रचारात कोणत्या चुका पक्ष आणि उमेदवारांना महागात पडू शकतात? आचारसंहितेचे नियम जाणून घ्या