Premanand Maharaj : मदीनामध्ये प्रेमानंद महाराजा यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्यांचा सामना करावा लागत आङे. दुसऱ्या बाजूला त्याला काहीजण सपोर्टही करत आहेत.

Premanand Maharaj : मथुरा-वृंदावनमधील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांची सध्या प्रकृती बिघडली आहे. यामुळे प्रेमानंद महाराज यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी मदीनामधील एक तरुण सुफियान इलाहाबादीने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. तरुणाच्या या पावलामुळे सोशल मीडियावर एकाबाजूला त्याचे खूप कौतूक केले जात आहे. पण दुसऱ्या बाजूला त्याला धमक्यांचा सामना करावा लागतोय.

इस्लाम हा सहिष्णुता आणि मानवतेचा धर्म

या संपूर्ण प्रकरणावर ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, इस्लाम हा सहिष्णुता आणि मानवतेचा धर्म आहे. याशिवाय मौलानांनी सुफियान यांनी प्रेमानंद महाराज यांच्यासाठी केलेली प्रार्थना इस्लाम धर्माच्या मूल्यांनुसार आहे. तसेच मी देखील प्रेमानंद महाराज यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करतो असेही मौलाना यांनी म्हटले. खरंतर, मदीनासारख्या पवित्र ठिकाणी प्रेमानंद महाराज यांच्यासाठी प्रार्थना करणे मानवतेचे एक उत्तम उदाहरण आहे.

एका बाजूला धमक्या तर दुसऱ्या बाजूला कौतूक

सुफियान यांनी प्रेमानंद महाराज यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनेमुळे धर्मांमधील सुसंवाद आणि बंधुता निर्माण होते. मात्र दुसऱ्या बाजूला कट्टरपंथीयांकडून धमक्या दिल्या जात आहेत. पण सुफियान यांना काहीजण सोशल मीडियावर पाठिंबा देखील देत आहेत. प्रेमानंद महाराज यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.