सार

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : पंतप्रधान पीक विमा योजना वर्ष 2016-17 मध्ये देशभरात सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक सुरक्षा आणि पिकाचे नुकसान झाल्यास विम्याची रक्कम दिली जाते.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : पंतप्रधान पीक विमा योजना म्हणजे PMFBY शेतकऱ्यांकरिता त्यांच्या पिकांच्या सुरक्षेसाठी सर्वात प्रभावी उपाय ठरत आहे. पिकांचे नुकसान किंवा अन्य प्रकारचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विम्याद्वारे भरपाई दिली जाते. शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी आठ वर्षांमध्ये देशभरामध्ये सुमारे 1 लाख 54 हजार 469 कोटी रुपये रक्कम वितरित करण्यात आली आहे.

पंतप्रधान पीक विमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) वर्ष 2016-17मध्ये सुरू करण्यात आली. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशभरातील 56.96 कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात आली आहे.  

शेतकऱ्यांना स्वस्त आणि सर्वसमावेशक पीक विमा उत्पादन उपलब्ध करून देणे, हा पंतप्रधान पीक विमा योजनेचा (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) मुख्य उद्देश आहे. या योजनेमध्ये धान्य पेरणीपासून ते पीक काढणीनंतरच्या सर्व गैर-प्रतिबंधित नैसर्गिक आपत्तींचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. कीड किंवा रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यासही आर्थिक मदत मिळते.

पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये

पंतप्रधान पीक विमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) पिकांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. या योजनेअंतर्गत प्रीमिअम कॅपिंग रद्द केल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही कपातीशिवाय दावा केलेली संपूर्ण रक्कम मिळू शकते. तसेच गारपीट, भूस्खलन, पूर आणि जंगलातील वणवा तसेच चक्रीवादळ, अतिवृष्टी यासारख्या स्थानिक आपत्तींमुळे पिकांचे होणारे नुकसान या  गोष्टींचा देखील PMFBYमध्ये समावेश आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करून पीक विम्याची रक्कम भरणे सोपे

PMFBY योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिकांची नुकसान भरपाई मिळावी, याकरिता रिमोट सेन्सिंग, स्मार्टफोन आणि ड्रोन तंत्राचा वापर केला जातो. राष्ट्रीय पीक विमा पोर्टल (NCIP) शेतकरी-विमाकर्ता-बँक कनेक्शनशी संबंधित प्रक्रियांचे डिजिटायझेशन करते.

रिमोट सेन्सिंगवर आधारित अचूक उत्पन्नाचा अंदाज तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या उत्पन्न अंदाज प्रणालीद्वारे (YES-TECH) केला जातो. यामध्ये जिओ टॅगिंग महत्त्वाची भूमिका बजावते.

आणखी वाचा

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षण अहवाल CM शिंदेंकडे सुपूर्द, आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

'आम्हाला मोदींची लोकप्रियता कमी करायचीय...', शेतकऱ्यांच्या आंदोलनामागील अजेंडा VIRAL VIDEOद्वारे उघड