सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची Porsche Car किंमत किती?, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

| Published : May 22 2024, 08:22 PM IST / Updated: May 22 2024, 08:31 PM IST

Porsche Car

सार

सध्या देशभर चर्चेत असलेली पोर्श कार लोकांना आलिशान अनुभव देते. मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? या कारची किंमत आणि फीचर्स काय असतील?, चला तर मग आपण जाणून घेऊयात या आलिशान पोर्शे कारची किंमत.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात रविवारी पहाटे आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची भीषण अपघाताची घटना घडली आहे. या घटनेदरम्यान देशभरात पोर्शे कार चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? या कारची किंमत आणि फीचर्स काय असतील?, चला तर मग आपण जाणून घेऊयात या आलिशान पोर्शे कारची किंमत.

पोर्श टायकन कारची किंमत किती?

सध्या देशभर चर्चेत असलेली पोर्श कार लोकांना आलिशान अनुभव देते. या कारच्या पॉवर आणि फीचर्समुळे या कारची किंमत तब्बल करोडो रुपयांच्या घरात जात आहे. Porsche Taycan ची एक्स-शोरूम किंमत 1.61 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 2.44 कोटी रुपयांपर्यंत आहे.

पोर्शे कारची फीचर्स?

Porsche Taycan ही उत्तम फीचर्स असलेली आलिशान कार आहे. ही कार 300 kW किंवा 408 PS ची पॉवर जनरेट करते. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात पोर्श टायकनचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट बाजारात दाखल झाले होते. Porsche Taycan Turbo GT ही एक शक्तिशाली आणि वेगवान कार आहे. ही कार फक्त 2.1 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडत आहे.

पोर्श टायकनमध्ये मॅट्रिक्स डिझाइन एलईडी हेडलाइट्स आहेत. तर या कारच्या टर्बो मॉडेल्समध्ये एचडी-मॅट्रिक्स डिझाइन आणि LED हेडलाइट्स बसवण्यात आले आहेत. कारमध्ये 360-डिग्री व्ह्यू कॅमेराची सुविधा देखील आहे. पोर्शच्या कारमध्ये तब्बल 10.9-इंच इतका टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे, जो नेव्हिगेशन सिस्टम आणि इन्फोटेनमेंट सिस्टम फीचर्स प्रदान करतो.

जर्मन कार निर्मात्याचा दावा आहे की, ही कार तब्बल 305 किमी प्रतितास इतका वेग देते. भारतातील पोर्शे SUV मध्ये Macan Turbo EV, Macan, Cayenne यांचा समावेश आहे. ही कार आलिशान असल्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये या कारचा चांगलाच दबदबा आहे.

आणखी वाचा :

Pune Porsche Crash: आताची मोठी बातमी, पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी