सार
क्रिकेट जगातील देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर नुकताच जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या परिवारासोबत फिरायला गेला होता. जम्मू-काश्मीरला 'पृथ्वीवरील स्वर्ग' असे म्हटले जाते.
PM Narendra Modi Shares Sachin Tendulkar Video : नुकत्याच काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर आपल्या परिवारासोबत जम्मू-काश्मीर येथे फिरायला गेला होता. खरंतर जम्मू-काश्मीरला 'पृथ्वीवरील स्वर्ग' असे म्हटले जाते. सचिनने आपल्या जम्मू-काश्मीरच्या प्रवासादरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सचिनचा एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर केला आहे.
पंतप्रधानांनी व्हिडीओ शेअर करत म्हटले की, “सचिनचा सुंदर जम्मू-काश्मीरचा प्रवास आपल्या तरुणांना दोन महत्त्वपूर्ण गोष्टी सांगतो. एक म्हणजे हा एक अतुल्य भारताचा शोध घेण्यासारखा आहे. दुसरा म्हणजे, मेक इन इंडियाचे महत्त्व दाखवून देतो. चला, एकत्रित मिळून एक विकसित आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती करूयात.”
सचिनने आतापर्यंत अनेकदा जम्मू-काश्मीरमला भेट दिली आहे. प्रत्येक वेळच्या जम्मू-काश्मीरच्या टूरचे फोटो-व्हिडीओ सचिनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशातच सचिनचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला, ज्यामध्ये सचिन जम्मू-काश्मीरच्या रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसला. याशिवाय आपल्या चाहत्याला त्याची स्वाक्षरी केलेली बॅटही गिफ्ट दिली.
खरंतर, त्या चाहत्याला दोन्ही हात नव्हते तरीही आपले खांदे आणि मानेच्या मदतीने क्रिकेट खेळतो. क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या चाहत्याला पाहून सचिन स्वत:ला रोखू शकला नाही आणि चाहत्याच्या संपूर्ण परिवाराला हॉटेलमध्ये बोलावून त्यांचे त्याने स्वागत केले.
आणखी वाचा :