सार

देशातील वेगवेगळ्या 10 ठिकाणांहून नमो ड्रोन दीदींनी एकत्रित ड्रोन उडविल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले आहे. याशिवाय पंतप्रधानांनी एक हजार ड्रोनही महिलांना दिले.

PM Modi interaction with Drone Didi's : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (11 मार्च) सशक्त नारी-विकसित भारत कार्यक्रमाअंतर्गत ड्रोन उडविणाऱ्या महिला म्हणजेच ड्रोन दीदींशी बातचीत केली. देशातील 10 वेगवेगळ्या ठिकाणांहून नमो ड्रोन दीदींनी एकत्रित ड्रोन उडविले. पंतप्रधानांना यावेळी एक हजार ड्रोनही महिलांना दिले.

याशिवाय पंतप्रधानांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातील बँकांच्या शिबिरांना उपस्थिती लावत सवलतीच्या व्याजदरात स्वयं सहायता समूहाला (एसएचजी) जवळजवळ आठ हजार कोटी रुपयांचे बँकेचे कर्जही दिले. पंतप्रधानांनी स्वयं-सहायता गटांना सुमारे 2,000 कोटी रुपयांचा भांडवली सहाय्य निधी देखील दिला.

नवा अध्याय लिहितायत ड्रोन दीदी- पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना संबोधित करताना म्हटले की, ड्रोन दीदी आणि लक्षाधीश दीदी यशाचे नवे अध्याय लिहित आहेत. अशा यशस्वी महिलांसोबत बातचीत करताना माझ्यात देशाच्या भविष्याबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो. याशिवाय समाजात संधी निर्माण करणे आणि नारी शक्तिची प्रतिष्ठा सुनिश्चित केल्यानंतरच प्रगती करू शकतो. महिलांनीच महिलांची मदत केल्यास नारी शक्ती पुढे जाऊ शकते. नरेंद्र मोदींनी म्हटले की, मी पहिलाच असा पंतप्रधान आहे ज्यांनी लाल किल्ल्यावरुन महिलांसाठी काही सुविधांच्या घोषणा केल्या आहेत.

आणखी वाचा : 

सैन्याचा हा कुत्रा शत्रूला युद्धात हरवणार, जो बर्फ, वाळवंट आणि पर्वतांमध्ये सैन्याला करेल मदत

निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांकडून हेलिकॉप्टर आणि प्रायव्हेट जेटच्या मागणीत वाढ, एका तासाठीचे भाडे ऐकून व्हाल हैराण

Loksabha Election : सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, शरद पवार यांनी केली उमेदवारी जाहीर