Parliament Attack 2001: आजच्याच दिवशी संसदेवर झाला होता दहशतवादी हल्ला, देशभरातून शहीदांना वाहिली जातेय श्रद्धांजली

| Published : Dec 13 2023, 11:19 AM IST / Updated: Dec 13 2023, 11:21 AM IST

parliament attack
Parliament Attack 2001: आजच्याच दिवशी संसदेवर झाला होता दहशतवादी हल्ला, देशभरातून शहीदांना वाहिली जातेय श्रद्धांजली
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Parliament Attack : 13 डिसेंबर, 2001 रोजी संसदेवर दहशवतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात संसद भवनातील माळी, दिल्ली पोलिसांसह एकूण 9 जण शहीद झाले होते. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या पाच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. 

22 Years of Parliament Attack : आजच्याच दिवशी (13 डिसेंबर) 2001 रोजी भारतीय संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू होते. कोणालाही अंदाज नव्हता त्यादरम्यान दहशतवादी हल्ला होईल. संसदेवर लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटनेकडून हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यामध्ये 14 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 8 सुरक्षा कर्मचारी आणि एक माळी देखील शहीद झाला होता. संसदेवर झालेल्या या हल्ल्यातील शहीदांना देशभरातून श्रद्धांजली वाहली जात आहे.

दहशतवाद्यांचा हल्ला
संसदेत हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू असतानाच अचानक गोळीबार होत असल्याचे आवाज येऊ लागले. दहशतवादी AK-47 रायफलसह एक पांढऱ्या रंगाची एंबेसडर कार मधून संसद भवनाच्या परिसरात घुसले होते. पांढऱ्या रंगाच्या कारमधील लष्करी गणवेश परिधान केलेल्या लोकांना पाहून संसेद भवनातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना ते दहशतवादी असतील असे वाटले नाही. पण कारमधील लोकांची वागणूक पाहून ते चुकीच्या उद्देशाने संसदेच्या परिसरात घुसल्याचा अंदाज सुरक्षा कर्मचाऱ्यांना आला.

संसदेच्या परिसरात आल्यानंतर दहशतवाद्यांची कार इमारतीच्या गेट क्रमांक 11 च्या दिशेने गेली असता तेथील एका सुरक्षा कर्मचाऱ्याला संशय आला. कारला मागे जाण्यास सांगितले. तो पर्यंत कारने तत्कालीन उपाध्यक्ष कृष्ण कांत यांच्या कारला धक्का दिला होता. यानंतर दहशतवादी AK-47 राफेल घेऊन कारमधून खाली उतरले आणि तेथेच गोळीबार सुरू केला.

दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद
गोळीबार सुरू झाल्यानंतर संसदेतील अलार्म वाजला. मुख्य इमारतीचे सर्व प्रवेशद्वार बंद केले गेले. संसदेत सुरक्षिततेसाठी तैनात करणाऱ्यात आलेल्या जवानांनी चहूबाजूंनी दहशतवाद्यांना घेरले. त्यानंतर जवळजवळ अर्धा तास दोन्ही बाजूने गोळीबार केला गेला. जवानांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला. या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान, सीआरपीएफमधील (CRPF) एक महिला हवालदारासह संसदेचे वॉच अ‍ॅण्ड वॉर्ड सेक्शनचे दोन सुरक्षा सहाय्यक, एक माळी आणि एक फोटोग्राफर शहीद झाला.

अडवाणीसह 200 खासदार संसदेत उपस्थितीत
दहशतवादी हल्ल्यावेळी संसदेत काही खासदार आणि मंत्री उपस्थितीत होते. हल्ल्यादरम्यान तत्कालीन गृह मंत्री लालकृष्ण आडवाणीयांच्यासह 200 खासदार संसदेच्या परिसरात उपस्थितीत होते.

हल्ल्यानंतरची स्थिती
ज्या दिवशी संसदेवर हल्ला झाला तेव्हाच पोलिसांनी एफआयआर (FIR) दाखल केला होता. काही दिवसांमध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने चार लोकांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या चार लोकांपैकी एक माजी जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (JKLF) दहशतवादी मोहम्मद अफजल गुरू, त्याचा चुलत भाऊ शौकत हुसैन गुरू, शौकत याची पत्नी अफसान गुरू आणि दिल्ली विद्यापीठातील अरबी भाषेचा व्याख्याता एसएआर गिलानी यांचा समावेश होता.

गिलानीला 2003 मध्ये दिल्ली हायकोर्टाने पुराव्यांअभावी सुटका केली. तर वर्ष 2005 मध्ये सुप्रीम कोर्टाने शौकत याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आणि अफजल गुरू याला 2013 मध्ये फाशी दिली गेली.

आणखी वाचा: 

CM Salary : भारतातील या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा पगार माहितेय का?

Article 370 : या न्यायाधीशांनी कलम 370 वर सुनावला ऐतिहासिक निर्णय

Jammu-Kashmir: राजौरीमध्ये दहशतवाद्यांचे 2 साथीदार अटकेत, दारूगोळाही जप्त