Parents Emotional Reaction to Sons Mall Billboard Photo Goes Viral: सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. यात आदर्श नावाच्या एका मुलानं आपल्या आई-वडिलांना शॉपिंग मॉलमध्ये एक सरप्राईज दिलं. मॉलच्या मोठ्या जाहिरात बोर्डवर त्यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलाचा फोटो पाहिला आणि ते भावुक झाले.

सोशल मीडियावर अनेकदा मनाला भिडणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ लोकांची मनं जिंकत आहे. एका शॉपिंग मॉलमध्ये लावलेल्या मोठ्या जाहिरात बोर्डवर आपल्या मुलाचा फोटो पाहून आई-वडिलांना काय वाटलं, हे या व्हिडिओत दिसतं. आदर्श नावाच्या एका तरुणानं हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्याचे आई-वडील आश्चर्यानं आणि आनंदानं त्याच्या पोस्टरकडे बघत आहेत.

पोस्टरवर मुलाचा फोटो पाहून आई-वडील भारावले

आदर्श आपल्या आई-वडिलांसोबत मॉलमध्ये फिरत होता. फिरता फिरता तो त्यांना अशा ठिकाणी घेऊन गेला, जिथे त्याचा फोटो असलेलं एक मोठं पोस्टर लावलेलं होतं. सुरुवातीला त्यांना काही कळलंच नाही, पण जेव्हा पोस्टरवर आपलाच मुलगा आहे हे लक्षात आलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान पाहण्यासारखा होता. सोशल मीडियावर त्यांच्या या प्रतिक्रियेनं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. व्हिडिओमध्ये आई-वडील आश्चर्यानं त्या पोस्टरकडे बघत उभे राहिलेले दिसतात.

आदर्शने व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिलं, 'स्वप्न पूर्ण झाल्याचा क्षण. माझ्यावर दुसऱ्या कुणापेक्षाही आधी यांनीच विश्वास ठेवला होता. ते मला पहिल्यांदाच एका पोस्टरवर बघत आहेत. हा क्षण माझ्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त मौल्यवान आहे.' व्हिडिओमध्ये त्याचे आई-वडील आश्चर्यानं आणि आनंदानं मुलाच्या पोस्टरकडे पाहतात आणि त्याला हात लावून आनंद व्यक्त करतात.

२० लाखांहून जास्त लोकांनी पाहिला व्हिडिओ

इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत २० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 'हा व्हिडिओ आई-वडिलांचं प्रेम आणि मुलांसाठी ते करत असलेल्या त्यागाची आठवण करून देतो,' असं अनेक युजर्सनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. एका युजरने लिहिलं, 'खरं यश हेच आहे. मुलं यशस्वी झाल्यावर आई-वडिलांना होणाऱ्या आनंदापेक्षा मोठं काहीच नाही.' तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केली, ‘त्यांच्या डोळ्यांतील चमकच सर्व काही सांगून जाते.’