
Gulabrao Patil
जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान आयोजित जनजाती गौरव सप्ताहाची माहिती दिली. या सप्ताहात आदिवासी बांधवांसाठी धरती आबा अभियान, पीएम जनमन, महिला बचत गटांच्या योजना, आरोग्य तपासणी, रोजगार प्रशिक्षण आणि शासकीय कागदपत्रांसाठी विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. जिल्ह्यातील ५१ पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. गोकुळ दूध संघाच्या निर्णयावर बोलताना संस्था चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला असावा, असे पाटील म्हणाले. अमित शाह यांच्या दबावामुळे निर्णय घेतल्याचा संजय राऊतांचा दावा त्यांनी फेटाळला. तसेच २० ते २२ आमदार बाहेर पडण्याच्या राऊतांच्या दाव्यावर टीका करत त्यांच्या भविष्यवाण्या कधीच खऱ्या ठरत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.