विजापूर जिल्ह्यातील मनगुळी येथील कॅनरा बँकेतून ₹५२.२६ कोटींचे ५८ किलो ९७६ ग्रॅम सोने आणि ₹५.२० लाख रोख रक्कम चोरीला गेली आहे. मे २३ रोजी घडलेल्या या घटनेत ६ ते ८ जणांचा समावेश असल्याचा संशय असून पोलिस तपास करत आहेत.
नुकत्याच झालेल्या सिंदूर ऑपरेशनच्या वेळी भारताने मात्र असे ड्रोन हल्ले यशस्वीपणे परतावून लावले होते. त्यामुळे या दोन्ही हल्ल्याची तुलना करत भारताला यातून कोणते धडे शिकण्यासारखे आहेत, हे आम्ही घेऊन आलोय.
आता आयआरसीटीसीने गुजरात टूर पॅकेज आणले आहे. त्यामुळे केवळ २१ हजार रुपयांमध्ये तुम्हाला गुजरातची सफर करणे शक्य होणार आहे.
इंडिगोच्या विमानाला पक्षी धडकल्याने ते नुकसानग्रस्त झाले. त्यामुळे वैमानिकाला त्याचे इमरजन्सी लॅन्डींग करावे लागले. या घटनेमुळे एव्हिएशन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. इतर विमाने उडवतानाही आवश्यक सतर्कता बाळगली जात आहे.
एका थ्री बीएचके फ्लॅटचे भाडे २.७ लाख असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामुळे या शहरातील वाढच्या भाड्याचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना पॅलेसिओस यांच्याशी भेट घेतली. यापूर्वी, राष्ट्राध्यक्ष पॅलेसिओस यांनी राजघाट येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.
विराट कोहली यांच्या बेंगळुरूतील वन८ कम्यून पबवर धूम्रपानविरोधी कायदा (COTPA, २००३) चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अचानक तपासणी केली असता तेथे धूम्रपान करण्यासाठी नियुक्त जागा आढळून आली नाही.
बंगळुरूमधील पंखुरी मिश्रा या तरुणीला ऑटोरिक्षा चालकावर चपलेने मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत असल्याने तिरुमला येथे भाविकांची गर्दी वाढली आहे. एकाच दिवशी जवळपास ९५ हजारांहून अधिक भाविकांनी स्वामींचे दर्शन घेतले आहे.
कोलकाता येथील इस्कॉन जगन्नाथ मंदिराच्या रथाची चाके बदलण्याचे २० वर्षांचे प्रयत्न आता फळाला आले आहेत. विशेष म्हणजे, या रथासाठी लाकडी किंवा दगडी चाके वापरण्याऐवजी, बोईंग विमानाचे चाक बसवण्यात आले होते.
India